शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

कर्मयोगी अण्णांचा वारसा प्रज्ञावंतांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 15:37 IST

आज समाजात शिक्षण क्षेत्रात जी विसंगती आणि विकृती भरलेली आहे़ ती पाहून मनात एक प्रकारचा उद्वेग निर्माण होतो़ अनुदानित अभ्यासक्रम कमी करून हळूहळू विनाअनुदानित शिक्षणाचा कल सरकारद्वारा जोपासला जातोय़ चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकशाही पध्दती मागे पडून साम्राज्यवादी, स्वसत्ताकेंद्री हुकूमशाही प्रवृत्ती बळावते आहे़ अशा अवस्थेत संभ्रम आणि द्विधावस्था असली तरी मला ठामपणे लोकशाही पध्दतीवर विश्वास आहे़ कारण या विपरित परिस्थितीत मला मानसिक आणि नैतिक मूल्याचे बळ माझ्या वडीलांच्या आध्यात्मिक वारशामुळे प्राप्त झाले़

सागर दुबेजळगाव : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी आणि मू़जे़ महाविद्यालय या शैक्षणिक संकुलाचा अध्यक्ष या नात्याने समाजात मला आज जे स्थान आहे़ त्यामागे वडील कै ़ अण्णासाहेब जी़डी़बेंडाळे यांचा वसा आणि वारसा मला लाभला़ त्यांचा मला सार्थ अभिमान वाटतो़ कै़ अण्णासाहेब यांनी या संस्थेच्या स्थापनेपासून आपले महत्वपूर्ण योगदान दिले़ १९५७ ते १९९९ पर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणाने सांभाळली़ बालपणापासून त्यांनी कुटुंबावर जे शैक्षणिक-सामाजिक संस्कार घडवले ते आम्हाला शिदोरीसारखे पुरून उरणारे ठरले़ त्यांच्या संस्कारांचा वसा घेऊनच आम्हा कुटुंबीयांची जडण-घडणी झाली़माझ्या तारूण्यात मला या शिक्षण संस्थेच्या सेवेची संधी मिळाली़ सन १९७६ साली माझे एम़एस़सी (अ‍ॅग्री) हे शिक्षण पूर्ण झाले़ मी पूर्ण वेळ शेती व्यवसाय केला परंतू, त्याबरोबरच अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी संस्थेच्या कार्याचे धडे गिरवित होतो़ सन १९८८ मध्ये मला केसीईच्या संचालक मंडळावर रितसर नियुक्ती लाभली़ पुढे २००८ पर्यंत मी संचालकपदाचा प्रदीर्घ अनुभव घेतला़ सन २००३ ते २००८ या कार्यकाळात मला संस्थेचा खजिनदार म्हणून कार्य करता आले़ सन २००८ पासून ते आजपावेतो अध्यक्षपदी विराजमान होऊन संस्थेच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न मला पूर्ण करता आले़ संस्थेच्या कार्याचा अभ्यास, अनुभव आणि ऋषीतूल्य अण्णासाहेबांचा वसा आणि वारसा यामुळेच मला प्रागतिक वाटचाल करता आली़ केसीईची पूर्वापार चालत आलेली ‘ज्ञानप्रसारो व्रतम’ ही ब्रीद संकल्पना पुढे बदलत्या काळानुसार संस्थेची ‘एक प्रगल्भ शैक्षणिक चळवळ’ म्हणून चाललेली वाटचाल अभिमानास्पद आहे़ या संस्थेची काही ठळक वैशिष्ट्ये इतर संस्थांपेक्षा आगळीवेगळी ठरतात़ समाजातील सर्व जातीधर्मांच्या विद्वानांची गुणवत्तापूर्ण शैक्षणिक मूल्ये जोपासणे ही परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहे़ अण्णांच्या मार्गदर्शनाखाली हा वारसा आजपावेतो सांभाळला आहे़ मला ऋषीतूल्य अण्णा आणि आई यांचा समृध्द वारसा लाभला़ गीतेचा कर्मयोग, ज्ञानतपस्वी, शिक्षणयोग आणि आरोग्य क्षेत्रातील शल्यचिकित्सक, विज्ञानयोगी आणि पातंजल अष्टांगयोगी बापाचा हा समर्थ वसा आणि वारसा मला लाभला़ या मायबापांच्या पालकत्वाचा सौभाग्ययोग मला लाभला़ त्यामुळेच मी कृतार्थ होऊन परिपक्व अशा पूर्णत्वाच्या क्षणाची निवृत्ती स्वीकारण्यास सहज तयार होऊ शकतो आहे़ सामाजिक भान, लोकशाही समाजवाद आणि सर्वसमावेशक सर्वांगिण विकासाचे धोरण मला आध्यात्म, स्थितप्रज्ञता आणि निखळ कर्मसंस्कृतीमधून माझ्या पालकांमधून बाळकडू रूपाने लाभले आहे़ या संस्थेचा हा अमृतमयी वटवृक्ष आणि त्यांच्या ज्ञानशाखांचा सर्वांगिण विस्तार हे माझे ध्येयस्वप्न पूर्णत्वास जाण्याने मला जी संतृप्तता लाभली आहे़ त्यामुळेच मी निवृत्तीचा विचार स्विकारतो आहे़ आद्य शंकाराचार्य यांच्या विधानानुसार ब्रह्मं सत्यं जगत्मिथ्या या कार्य संस्कृतीतून आणि कर्मयोगातून मला उर्वरित आयुष्य पिंडी ते ब्रह्मांडी असा अनुभूतीपूर्वक प्रवासाचा कर्मयोग साधायचा आहे़ माझी ही वसा आणि वारसा जोपासण्याची शाश्वत विचारधारा निवृत्तीची नसून ही संतृप्तीची आहे़ कारण कर्मयोग्याला निवृत्ती नसते़ त्याला शेवटच्या श्वासापर्यंत कर्म करायचे असते़ म्हणून त्याची कर्मभूमी वेगळी असले़ मी माझा समृध्द वसा-वारसा घेऊन विश्वातल्या माझ्या आवडीच्या त्या वेगळ्या क्षेत्रात कर्मयोग साधण्यासाठी, या क्षेत्रातील तथाकथित निवृत्ती घेईन असे मला नम्रपणे सांगायचे आहे़ 

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव