कर्कीत पावणेदोन लाखाची चोरी
By Admin | Updated: July 4, 2017 11:17 IST2017-07-04T11:16:14+5:302017-07-04T11:17:39+5:30
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रय} : कडी-कोयंडा तोडून चोर घुसले घरात

कर्कीत पावणेदोन लाखाची चोरी
ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर, दि.4 - तालुक्यातील कर्की या गावात 2 जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी धुमाकूळ घालत घरफोडी करून पावणे दोन लाखांचा ऐवज लांबविला तर अन्य एका घरासह विठ्ठल -रुक्मिणी मंदिर व पानटपरीला देखील लक्ष्य केले.
कर्की येथील धनंजय दशरथ पाटील हे झोपलेले असताना घराच्या मागील बाजूच्या दाराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. कपाटातील चार तोळे सोन्याची पोत (80 हजार), 15 ग्रॅम सोन्याचा हार (30 हजार), 5 ग्रॅम सोन्याच्या साखळ्या (12 हजार), 5 ग्रॅम कानातील सोन्याचे टॉप (10 हजार), एक ग्रॅम वजनाची सोन्याची बाही (2 हजार) आणि 44 हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 78 हजार रुपयाचा ऐवज लांबवून पोबारा केला. पहाटे पाटील यांच्या प}ी उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचा हा प्रकार लक्षात आला.
दुस:या घराकडे मोर्चा
चोरटय़ांनी कडू नागराज पाटील यांच्याकडे ही घरफोडी केली, मात्र गुन्हा दाखल नसल्याने या घरफोडीतील तपशील कळू शकला नाही.
चोरटे मंदिरातही शिरले
दरम्यान, गावातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात ही चोरटे घुसले. येथे त्यांच्या हाती काहीच लागले नाही गावाबाहेर पडताना चोरटय़ांनी पानटपरीला ही लक्ष केले होते.