कर्कीत पावणेदोन लाखाची चोरी
By Admin | Updated: July 4, 2017 01:18 IST2017-07-04T01:18:33+5:302017-07-04T01:18:33+5:30
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रय} : कडी-कोयंडा तोडून चोर घुसले घरात

कर्कीत पावणेदोन लाखाची चोरी
मुक्ताईनगर : तालुक्यातील कर्की या गावात 2 जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी धुमाकूळ घालत घरफोडी करून पावणे दोन लाखांचा ऐवज लांबविला तर अन्य एका घरासह विठ्ठल -रुक्मिणी मंदिर व पानटपरीला देखील लक्ष्य केले. त्यामुळे ग्रामीण भागातील ही घरफोडी धक्कादायक आणि भीतीदायक ठरली आहे
कर्की येथील धनंजय दशरथ पाटील यांचे राहते घर लक्ष्य करीत चोरटय़ांनी पाटील कुटुंबीय घरात झोपलेले असताना घराच्या मागील बाजूच्या दाराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
घरात असलेल्या कपाटातील सामनाची नासधूस केली. कपाटातील चार तोळे सोन्याची पोत (80 हजार), 15 ग्रॅम सोन्याचा हार (30 हजार), 5 ग्रॅम सोन्याच्या साखळ्या (12 हजार), 5 ग्रॅम कानातील सोन्याचे टॉप (10 हजार), एक ग्रॅम वजनाची सोन्याची बाही (2 हजार) आणि 44 हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 78 हजार रुपयाचा ऐवज लांबवून पोबारा केला. पहाटे पाटील यांच्या प}ी उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचा हा प्रकार लक्षात आला.
दुस:या घराकडे मोर्चा
शिवाय कडू नागराज पाटील यांच्याकडे ही घरफोडी केली, मात्र गुन्हा दाखल नसल्याने या घरफोडीतील तपशील कळू शकला नाही.
चोरटे मंदिरातही शिरले
दरम्यान, गावातील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात ही चोरटे घुसले. येथे त्यांच्या हाती काहीच लागले नाही गावाबाहेर पडताना चोरटय़ांनी पानटपरीला ही लक्ष केले होते.
अधिका:यांची धाव
घटना स्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे, पोलीस निरीक्षक अशोक कडलग, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत कडुकार व पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली शिवाय घटनास्थळी जळगावचे श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते.
याप्रकरणी मुक्ताईनगर येथील पोलिसात धंनजय पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गु.र.नं. 125/2017 भादंवि कलम 380,457 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मुक्ताईनगर पोलीस करीत आहेत.
श्वान घुटमळले..
चोरटय़ांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी जळगाव येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान पथक चोरटय़ांचा माग काढू शकले नाही. ते घटनास्थळीच घुटमळले.त्यामुळे पोलिसांच्या तपासाच्या दिशेवर लक्ष लागले आहे. लोकांमध्ये घबराट पसरली आहे.पोलीस चोरटय़ांच्या मागावर आहेत.
ग्रामीण भागातही
चोरटे शिरले..
4मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की या गावात अचानक चोरटय़ांनी धुमाकूळ घातला त्यामुळे हा भाग ढवळून निघाला आहे. बहुदा ब:याच काळानंतर या भागात चोरी झाल्याची घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. सहसा या भागात चोरी-घरफोडीच्या घटना घडत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र 2 रोजीच्या चोरीच्या घटनेने या परिसरात रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. परंतु चोरी झालेल्या घरात घरच्याकडून सामानाची हालचाल झाल्यामुळे श्वान चोरटय़ांचा माग काढू शकले नाही. ते घटनास्थळीच घुटमत राहिले. मंदिरातून काही गेले नाही.तपास सुरू आहे.
- सुभाष नेवे,
उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर.