कन्नड घाट छोट्या वाहतुकीसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST2021-09-16T04:23:06+5:302021-09-16T04:23:06+5:30

चाळीसगाव : कन्नड घाटातून दुचाकी,हलक्या व छोट्या वाहनांसाठी बुधवारपासून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मोठी अवजड वाहने या ...

Kannada Ghat open for small traffic | कन्नड घाट छोट्या वाहतुकीसाठी खुला

कन्नड घाट छोट्या वाहतुकीसाठी खुला

चाळीसगाव : कन्नड घाटातून दुचाकी,हलक्या व छोट्या वाहनांसाठी बुधवारपासून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मोठी अवजड वाहने या ठिकाणाहून जावू नये म्हणून फारेस्ट चौकीजवळ व घाटाच्या खाली कमी उंची असलेली कमान लावण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

औरंगाबाद-धुळे या महामार्गावर औट्रम घाटातील साखळी क्र. 376 000 ते 390 000 मधील रस्ता 31 ऑगस्ट, 2021 रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटातील मार्ग खचला होता. तसेच घाटात जागोजागी दरड कोसळल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी एका बाजुस दरी व दुस-या बाजुस डोंगर असल्यामुळे वाहन दरीत कोसळण्याची किंवा अपघात होण्याची दाट शक्यता होती. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करुन औरंगाबाद ते धुळे वाहतुक करणार्या दुचाकी, हलक्या व छोट्या वाहनांसाठी बुधवार, १५ पासून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

अद्याप अवजड वाहतुकीला परवानगी नाही

सध्या या घाटात रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून अवजड वाहनांसाठी रस्ता सुरु करणे सुरक्षित नाही. त्यामुळे औरंगाबाद-धुळे वाहतुक करणा-या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी खालील मार्गाने वाहतूक वळविण्यात आलेली आहे. सर्व प्रकारच्या अवजड वाहनासाठी औरंगाबादकडून धुळेकडे येणारी व जाणारी जड वाहतूक ही औरंगाबाद-देवगाव रंगारी-शिऊर बंगला-नांदगांव-मालेगाव मार्गे धुळ्याकडे व औरंगाबादकडून चाळीसगावकडे येणारी व जाणारी वाहतूक ही औरंगाबाद-देवगाव रंगारी-शिऊर बंगला-नांदगांवमार्गे चाळीसगावकडे अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आल्याचे महाव्यवस्थापक (तांत्रिक) तथा प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

कन्नड घाटाचे काम पूर्ण होईपर्यंत या घाटातून केवळ मोटारसायकल, कार, ॲम्बुलन्स या लहान वाहनांनाच परवानगी आहे. त्यादृष्टीने पोलिसांचे काम सुरू असल्याची माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भागवत पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.

फोटो मॅटर

कन्नड घाटाच्या पायथ्याशी अवजड व मोठी वाहने जावू नये म्हणून कमी उंची असलेली अशी कमान लावण्यात आली आहे.(छाया-संजय सोनार, चाळीसगाव )

Web Title: Kannada Ghat open for small traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.