कंडारीत धाडसी घरफोडी
By Admin | Updated: February 15, 2017 00:31 IST2017-02-15T00:31:24+5:302017-02-15T00:31:24+5:30
चोरटे शिरजोर : बंद घरातून सव्वादोन लाखांचे सोने लंपास

कंडारीत धाडसी घरफोडी
भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथील सम्राट कॉलनीतील रहिवासी तथा रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी किशोर रामभाऊ पाथरवट यांच्या बंद घरातून चोरटय़ांनी सुमारे सव्वादोन लाख रुपये किंमतीचे आठ तोळ्यांचे दागिने लांबवल़े या चोरीमुळे गावात मोठी खळबळ उडाली़
पाथरवट हे गेल्या तीन महिन्यांपासून बदलापूर येथे मुलाकडे गेल्याने घराला कुलूप होत़े मंगळवारी ते परतल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आल़े
चोरटय़ांनी कपाटातील पावणेतीन तोळ्याचे गंठण, दहा ग्रॅमच्या अंगठय़ा, अडीच तोळ्याचा नेकलेस, ठुशी, एक ग्रॅमच्या बाळाच्या आठ अंगठय़ा असा ऐवज लांबवला़ आजच्या भावानुसर त्याची किंमती सव्वादोन लाखांवर आह़े किरकोळ रोकडही लांबवण्यात आली़
दरम्यान, रात्री उशिरार्पयत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितल़े