कामिनी, पूजा यांची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:20+5:302021-09-22T04:20:20+5:30
जळगाव : २० वी ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकतीच अमरावती येथे पार पडली. त्यात चोपडा येथील ...

कामिनी, पूजा यांची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
जळगाव : २० वी ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकतीच अमरावती येथे पार पडली. त्यात चोपडा येथील अष्टविनायक स्पोर्टस क्लबचा महिला क्रिकेट संघ सहभागी झाला होता. यातील कामिनी पाटील आणि पूजा पाटील या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दोन्ही खेळाडू चोपडा येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पंकज कला व विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थिनी आहेत.
राज्यस्तरीय स्पर्धेत अष्टविनायक क्लबच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. राष्ट्रीय स्पर्धा २२ ते २६ सप्टेंबर या दरम्यान जम्मू -काश्मीर येथे होणार आहे. या खेळाडूंचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, पंकज बोरोले, एम.व्ही. पाटील, व्ही.आर. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर पाठक, क्रीडा संचालक प्रा.डॉ.विजय पाटील यांनी कौतुक केले.