सावखेडा-पातोंडा रस्त्यावर काळविटाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 22:00 IST2019-09-21T22:00:41+5:302019-09-21T22:00:46+5:30
मुंगसे, ता.अमळनेर : येथून जवळच असलेल्या सावखेडा ते पातोडा रस्त्यावर अज्ञात वहानाच्या धडकेने वन्यप्राणी काळवीट शनिवारी मृत अवस्थेत पडलेले ...

सावखेडा-पातोंडा रस्त्यावर काळविटाचा मृत्यू
मुंगसे, ता.अमळनेर : येथून जवळच असलेल्या सावखेडा ते पातोडा रस्त्यावर अज्ञात वहानाच्या धडकेने वन्यप्राणी काळवीट शनिवारी मृत अवस्थेत पडलेले आढळले.
पारोळा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एस.दसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वंदना कोळी, रखवालदार समाधान पाटील, संदीप निकम यांनी पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी अमळनेर पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन तालुका पशुधन अधिकारी व्ही.बी.भोई यांनी शवविच्छेदन करून वनपाल वंदना कोळी यांच्या ताब्यात दिले. वनविभागास भानुदास पाटील, मुंगसे, हेमंत देशमुख, सोपान लोहार, भैय्या संदानशिव यांनी सहकार्य केले.