कजगावात एक रकमी वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 17:22 IST2020-11-25T17:21:47+5:302020-11-25T17:22:11+5:30
एक रकमी वीज बिलाची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांचा वीज वितरण कंपनीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कजगावात एक रकमी वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा सत्कार
कजगाव, ता.भडगाव : एक रकमी वीज बिलाची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांचा वीज वितरण कंपनीच्या वतीने बुधवारी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. कंपनीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गावातील काही उद्योजकांनी दि.२५ रोजी एक रकमी विजबिलांचा भरणा करून महावितरणाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यावेळी एक रकमी वीजबिल भरणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पी. जी. बोरनारे, कजगाव सबस्टेशनचे योगेश देशमुख, सिद्धार्थ निकम, समाधान मानकर, संजय चौधरी, किरण पाटील, समाधान पाटील, प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते
दरम्यान, याप्रसंगी वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.