तीनच दिवसात कुलीची लागली होती अभियंतापदी वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST2021-09-24T04:19:45+5:302021-09-24T04:19:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत काय प्रकार घडतील हे आता सांगणे कठीण असून, आता मनपात ११९१ मध्ये वर्ग ...

तीनच दिवसात कुलीची लागली होती अभियंतापदी वर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत काय प्रकार घडतील हे आता सांगणे कठीण असून, आता मनपात ११९१ मध्ये वर्ग ४ पदासाठी झालेल्या भरतीप्रक्रियेअंतर्गत मजूर पदासाठी घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची अवघ्या तीनच दिवसात मजूरावरून थेट कनिष्ठ अभियंतापदी वर्णी लावण्यात आली होती. याप्रकरणी आता शासनाने तब्बल २५ वर्षानंतर अखेर निर्णय दिला असून, आधी मजूर पदावरून थेट अभियंतापदावर गेलेल्या अधिकाऱ्यांना आता अभियंता पदावरून थेट मजूर पदावर आणण्याचे आदेशच शासनाने काढले आहेत.
नगरपालिकेने मजूर, वॉचमन, गटर कामगारपदी ६७ जणांची भरती केल्यानंतर केवळ तीनच दिवसात वर्ग ४ वरून थेट वर्ग ३ व २ च्या पदावर कर्मचाऱ्यांना पोहचविले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांनी २०१९ मध्ये जिल्हाधिकारी व शासनाकडे तक्रार केली होती.
रायसोनी यांच्या कार्यकाळात झाली होती भरती
१९९१ मध्ये तत्कालीन नगरपालिकेत वर्ग ४ पदासाठी घेण्यात आलेल्या भरतीच्यावेळेस प्रदीप रायसोनी हे नगराध्यक्ष होते. तर मुख्य अधिकारी म्हणून पी.डी.काळे यांच्याकडे पदभार होता. २४ जून २०१९ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी भ्रष्टाचार निमूर्लन समितीच्या बैठकीत बेकायदेशिररित्या पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांना मुळ पदावर आणण्याचा सूचना दिल्या होत्या. तसेच पदोन्नती देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
या कर्मचाऱ्यांचा आहे समावेश
अधिकाऱ्याचे नाव - नियुक्तीचे पद - पदोन्नतीनंतर मिळालेले पद
अरविंद भोसले - मजूर - उपआवेक्षक
ईस्माईल शे.अब्दुल - मजूर - सर्व्हेअर
संजय नेवे - मजूर - बिल्डिींग इन्स्पेक्टर
गोपाळ लुल्ले - मजूर - सर्व्हेअर - बडतर्फ
जितेंद्र यादव - मजूर - बिल्डिंग इन्स्पेक्टर
मंजूर खान -मजूर - बिल्डिंग इन्स्पेक्टर
संजय नेमाडे - माळी - बिल्डिंग इन्स्पेक्टर
सुनील भोळे - मजूर - कनिष्ट अभियंता
विलास सोनवणी - मजूर - कनिष्ट अभियंता
चंद्रकांत वांद्रे - वॉचमन - क्लोरीन आॅपरेटर
डॉ.रामकृष्ण रावलाणी - कुली - मिश्रक
राजेंद्र पाटील - माळी - आरोग्य निरीक्षक
फिरोज काझी - मजूर - सर्व्हेअर
अकबर पिंजारी - मजूर - उद्यान अधीक्षक
शिवलाल पाटील - माळी - मोटार चालक
राजेंद्र वाघ - माळी - मोटार चालक
अकबर अली सैय्यद - माळी - मोटार चालक
रमेश तांबट - माळी - मोटार चालक
सुरेश कोळी - माळी - मोटार चालक
संजय पाटील - मजूर - बिल्डिंग इन्स्पेक्टर
विलास सुर्वे - मजूर - इलेक्ट्रिक ओव्हरसियर
विलास पाटील - मजूर - इलेक्ट्रिशीयन