अवघ्या दहा महिन्यात देवेश भय्याने पटकाविले १२ सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 07:31 PM2021-02-02T19:31:47+5:302021-02-02T19:33:55+5:30

कोरोना काळातील संधीचे सोने : सॅट जनरल मॅथ परिक्षेत पैकीच्या पैकी

In just ten months, Devesh Bhaiya won 12 gold medals | अवघ्या दहा महिन्यात देवेश भय्याने पटकाविले १२ सुवर्णपदक

अवघ्या दहा महिन्यात देवेश भय्याने पटकाविले १२ सुवर्णपदक

googlenewsNext


जळगावः कोरोना म्हटंल की अजूनही संमिश्र भावना जागी होते, कारण कोणाला हे संकट तर कोणाला ती संधी वाटते. गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रातही ऑनलाईनचीच चर्चा होती. जळगावच्या देवेश भय्या या अवघ्या १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने ही ऑनलाईन परिक्षांची संधी हेरली आणि अवघ्या दहा महिन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आतंरराष्ट्रीय पातळीवरील विविध देशांमधील गणिताच्या परिक्षांमध्ये यशस्वी होत १२ सुवर्ण पदके प्राप्त करीत जणू विक्रमच केला आहे.

अमेरिकेतील जॉन हॉपकीन विद्यापीठाच्या सॅट जनरल मॅथ परिक्षेत देवेश भय्याने ८०० पैकी ८०० गुण मिळवित ह्यग्रँड ऑनर अ‍ॅवार्ड मेडलह्ण प्राप्त करीत १२ व्या वर्षी या विद्यापीठाच्या सेंटर फॉर टॅलेंट युथ मध्ये स्थान मिळविले आहे. थायलंड इंटर नॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड, साऊथईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड या तीनही परिक्षेत त्याने प्रथम वर्ल्ड रँक मिळवित सुवर्णपदके मिळविली. सिंगापूर अ‍ॅन्ड एशियन स्कूलमध्ये मॅथ्स ऑलींपियाड, इंटरनॅशनल ज्युनियर मॅथ ऑलींपियाड, हाँग काँग इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलींपियाड, इंटरनॅशनल मॅथ कांगारु कॉम्पीटिशन, सिंगापूर इंटरनॅशनल मॅथ्स ऑलींपियाड चॅलेंज, साऊथ ईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड एक्स नेक्स्ट लेव्हल या सहा परीक्षेत देवेशला इंटरनॅशनल गोल्ड मेडल प्राप्त झाली आहे. या परिक्षांपैकी तीन परिक्षेत देवेशला वर्ल्ड चॅम्पीयन होण्याचा सन्मान देखील लाभला.

ऑनरचा मिळाला बहूमान
वर्ल्ड इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलींपियाडमध्ये द्वितीय रँक तर आशिया इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलींपियाडमध्ये तृतीय रँक (वर्ल्ड सेकंड रनर अप) हे स्थान प्राप्त करीत त्याने आणखी दोन सुवर्ण पदके पटकावली आहे. या बारा सुवर्ण पदकाशिवाय याच कालावधीत देवेशला अमेरिकन मॅथ कॉन्टेस्ट (इ.८ वी) मध्ये प्रथम रँक तर अमेरिकन मॅथ कॉन्टेस्ट (इ.१० वी) मध्ये ऑनरचा बहूमान मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन मॅथ कॉन्टेस्टमध्ये त्याने हायर डिस्टींग्शन तर पर्पल कामेंट मॅथ मीट २०२० चा तो विजेता ठरला आहे. अ‍ॅलन चॅम्प २०२० बेस्ट ब्रेन ऑफ इंडिया म्हणून देखील देवेशची निवड झाली आहे.

कोण आहे देवेश भय्या
देवेश हा एल.एच.पाटील इंग्लीश मिडीयम स्कूलमधील सातवीचा विद्यार्थी असून साने गुरुजी कॉलनी परिसरातील व्यंकटेश कॉलनीमधील रहिवासी आर्किटेक्ट पंकज भय्या व इंटेरियर डिझाईनर पल्लवी भय्या यांचा तो सुपूत्र आहे. गेल्या वर्षी देवेशला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने राष्ट्रपती व पंतप्रधानाच्या उपस्थितीत दिल्लीत गौरविण्यात आले होते.

 

Web Title: In just ten months, Devesh Bhaiya won 12 gold medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.