शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

जळगावात गणेशोत्सवानंतरच नवीन महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 12:05 IST

मनपा : जिल्हाधिकारी पाठविणार विभागीय आयुक्तांना अहवाल; 25 दिवसात विशेष सभा

ठळक मुद्देमहापौरपदाचा कार्यभार कोल्हेंकडेदोन ओळींचे राजीनामा पत्रअन् आयुक्त आले कॅबिन सोडून बाहेर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 - जळगाव महापालिकेचे महापौर नितीन लढ्ढा यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी आता विभागीय आयुक्त येत्या 25 दिवसात निर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन नवीन महापौरांची निवड करतील. या पदासाठी सत्ताधारी खान्देश विकास आघाडीकडून उपमहापौर ललित कोल्हे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. महापौर नितीन लढ्ढा हे राजीनामा देणार याबाबत गेल्या दोन दिवसांपासून चर्चा होती. त्यानुसार त्यांना राजीनामा देण्याबाबत पक्षाकडून आज सकाळी निरोप आला. सकाळी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या समवेत काही कार्यक्रमांना उपस्थिती दिल्यानंतर लढ्ढा हे जिल्हाधिका:यांची भेट घेऊन राजीनामा देणार होते. मात्र जिल्हाधिकारी नेरी येथे एका कार्यक्रमास गेले असल्याने सायंकाळी 7.30 वाजता भेटीचा मुहूर्त ठरला होता. जिल्हाधिका:यांनी केले कामाचे कौतुकपिंपरी-चिंचवड महापालिकेत आपण काम केले त्यानंतर अवघ्या दीड महिन्यापासून आपण लढ्ढा यांच्या समवेत काम केले. त्यात मोठे समाधान मिळाल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी काढले. ते पुढे म्हणाले, गोलाणी, मार्केट, स्वच्छता मोहीम, गाळ्यांसंदर्भात व्यापा:यांवर एकदम अन्याय होऊ नये अशी भूमिका, फुले मार्केट मधील स्वच्छतेचा विषय अशा अनेक विषयात लढ्ढा यांची भूमिका अतिशय सकारात्मक  होती. गाळे प्रश्नी कोणतीही घाई नको असे त्यांनी सांगितले तसेच अजिंठा चौफुलीवरील अतिक्रमण व अन्य कारवाईत त्यांनी कधीही फोन करून विरोध केला नाही. प्रशासनाच्या योग्य निर्णयात त्यांची नेहमी साथ राहीली, ही त्यांची फार मोठी जमेची बाजु असल्याचेही जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर म्हणाले. उपमहापौर खाविआचा़़़ उपमहापौर ललित कोल्हे यांना महापौरपदी बढती मिळण्याचे निश्चित झाल्याने त्यांचे उपमहापौरपदही  रिक्त होणार आहे. त्यामुळे आगामी उपमहापौरपद हे खाविआकडे जाणार असल्याचे समजते. या पदावरील उमेदवाराच्या नावावर येत्या शुक्रवारी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या उपस्थितीत होणा:या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. अन लढ्ढांना रडू कोसळलेराजीनामा दिल्यानंतर प्रथम जिल्हाधिका:यांनी मनोगत व्यक्त केले.  त्यानंतर बोलण्यास सुरूवात करत असताना लढ्ढा यांना अश्रु अनावर झाले. ते रडत असल्याचे पाहून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व लढ्ढा यांचे सहकारी पुढे सरसावले व त्यांनी लढ्ढा यांना शांत केले. गणेशोत्सवानंतर 12 वे महापौरनितीन लढ्ढा यांनी राजीनामा दिल्याने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे लढ्ढा यांचे राजीनामा पत्र विभागीय आयुक्तांकडे पाठवतील. त्यानंतर 25 दिवसात विभागीय आयुक्त निर्वाचित सदस्यांची विशेष सभा घेण्याचे आदेश करतील. त्यामुळे आता गणेशोत्सवानंतरच महापालिकेस नवीन 12 वे उपमहापौर लाभतील. महापौर नितीन लढ्ढा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आता महापौरपदाचा कार्यभार हा उपमहपौर ललित कोल्हे यांच्याकडे               गुरूवारपासून येईल. ललित कोल्हे हे बुधवारीदेखील मुंबईत होते. ते गुरूवारी सकाळी जळगाव येथे दाखल होणार आहेत. त्यानंतर ते प्रभारी    महापौरपदाचा कार्यभार स्विकारतील असे सूत्रांनी सांगितले. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे राजीनामा पत्र देऊन अध्र्या तासात नितीन लढ्ढा त्यांच्या कॅबिनमधून बाहेर पडले. लढ्ढा भावुक झालेले बघून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे स्वत: त्यांना सोडण्यासाठी कॅबिनबाहेर आले व खाली महापौरांच्या वाहनार्पयत येऊन त्यांनी लढ्ढा यांना निरोप दिला. सायंकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी महापौर नितीन लढ्ढा यांचे जिल्हाधिका:यांच्या दालनात आगमन झाले. यावेळी त्यांनी जिल्हाधिका:यांना दोन ओळींचे राजीनामा पत्र दिले. या पत्रात म्हटले आहे की, मी आज रोजी माङया महापौर पदाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्विकार करून मंजूर करावा ही नम्र विनंती. असा उल्लेख होता.