अवघ्या २२ दिवसांत ६२ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST2021-09-24T04:19:07+5:302021-09-24T04:19:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : तालुक्यात अवघ्या २२ दिवसांत ६२ जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे, तर ...

अवघ्या २२ दिवसांत ६२ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यात अवघ्या २२ दिवसांत ६२ जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे, तर १७ रोजी एकाच दिवसात २२ जणांना कुत्र्याने चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
भाद्रपद महिन्यानंतर कुत्रे पिसाळण्याचे प्रमाण वाढते. डोक्यावर आणि कानाजवळ झालेल्या जखमा सावळत नाहीत. त्यामुळे चिडलेली कुत्री नागरिकांना चावत सुटत आहेत. तालुक्यात १० दिवसांत मंगरूळ, जानवे, शनिपेठ, रणाईचे, गडखांब, सबगव्हाण, झाडी, कोळपिंप्री, चांदणी कुऱ्हे, जैतपीर, सारबेटे, ढेकू, अंबासन, रामेश्वर आदी गावांत, तर शहरात आर.के.नगर, पिंपळे रोड, ढेकू रोड, हरिओमनगर, पानखिडकी, पैलाड, शिवसमर्थ कॉलनी या भागांत पिसाळलेले कुत्रे चावा घेत असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.
१७ रोजी एकाच दिवसात रवींद्र जिजाबराव वाडिले, प्रकाश साहेबराव पाटील, गणेश अभिमान वंजारी, जितेंद्र आनंदा माळी, धीरज विश्वनाथ पाटील, कमलबाई रामरथ पाटील, आयर्न किरण देसले, रिजवान शेख खुर्शीद, हेमंतकुमार बाळासाहेब शिसोदे, गायत्री कैलास चौधरी, निखिल सुरेश पाटील, चैताली अनिल वैदू, अरुण कृष्णा पाटील, प्रवीण मधुकर वाणी, महेश पांडुरंग कुवर, रमेश चौधरी या २२ जणांना चावा घेतला आहे.
१ रोजी १, २-१, ३-४, ४-१, ५-०, ६-०, ७-१, ८-४, ९-६,११-२, १२-०, १३ रोजी ३, १४-१, १५-२, १६-५, १७-२२, १९-२, २०-६, २१-०, २२ रोजी १ अशा एकूण ६२ जणांना अवघ्या २२ दिवसांत चावा घेतला आहे.
नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांना पकडले पाहिजे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत असले, तरी प्राणिमित्रांच्या भीतीने आरोग्य विभाग कारवाई करण्यास धजावत नाही. जवळपास सर्वांना कमरेच्या खाली कुत्र्यांनी चावा घेतला आहे. काहींना मोठे लचके तोडल्याने खोल जखमा झाल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात इंजेक्शन घेणाऱ्यांची गर्दी होत आहे. काही लोक आयुर्वेदिक उपचार घेत आहेत.