अवघ्या २० मिनिटात वकिलाचे २ लाख ६० हजार लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:05+5:302021-02-05T05:56:05+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲड.जुबेर खान हे जळगाव न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. मंगळवारी सकाळी न्यायालयात जाण्यासाठी घरातून निघाले व बाहेर ...

In just 20 minutes, 2 lakh 60 thousand of lawyers were removed | अवघ्या २० मिनिटात वकिलाचे २ लाख ६० हजार लांबविले

अवघ्या २० मिनिटात वकिलाचे २ लाख ६० हजार लांबविले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲड.जुबेर खान हे जळगाव न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. मंगळवारी सकाळी न्यायालयात जाण्यासाठी घरातून निघाले व बाहेर उमर फारुख शेख यांच्यासोबत ते अपार्टमेंटमधील रिकामा प्लॅट बघण्यासाठी गेले. तत्पूर्वी त्यांनी २ लाख ६० हजार रुपये रोकड असलेली बॅग तसेच दुसरी लॅपटॉपची बॅग दुचाकीच्या (क्र.एम.एच.१९ बी.आर.३२५५) हँडलला लावली. या बॅगांमध्ये रोकडसह, तीन पेनड्राइव्ह, बँकांचे धनादेश इतर कागदपत्रे होती. २० मिनिटात अपार्टमेंटच्या खाली आल्यावर दुचाकीच्या हँडलला अडकवलेली बॅग गायब झाली होती. या प्रकाराने हादरलेल्या खान यांनी आजूबाजूला चौकशी केली व एका इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक व्यक्ती संशयास्पद दिसून येत आहे.

या घटनेनंतर ॲड. खान यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना झाल्याप्रकाराची माहिती दिली. शिकारे, सहायक फौजदार अतुल वंजारी व सहकाऱ्यांनी घटनास्थळ तसेच सीसीटीव्ही फुटेजवरून माहिती संकलित करून संशयितांचा शोध घेतला. दुपारी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: In just 20 minutes, 2 lakh 60 thousand of lawyers were removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.