जुगाराचा डाव उधळला : ३२ अटकेत

By Admin | Updated: May 20, 2017 00:24 IST2017-05-20T00:24:24+5:302017-05-20T00:24:24+5:30

मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्यावरील हॉटेल रावसाहेबवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ३२ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली

Junk's bail plea dismissed: 32 accused | जुगाराचा डाव उधळला : ३२ अटकेत

जुगाराचा डाव उधळला : ३२ अटकेत

ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 20 - मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्यावरील हॉटेल रावसाहेबवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ३२ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली तर दहा दुचाकींसह चार चारचाकी व तीन लाख ४० हजारांची रोकड व एक लाख १९ हजारांचे देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे़ जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या धाडीनंतर जुगाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे़
अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या सूचनेनुसार व भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़ या कारवाईत उपनिरीक्षक युवराज अहिरे, प्रदीप पाटील, एएसआय दिलीप कोळी, संकेत झांबरे, विशाल चव्हाण, राजेश काळे, बाजारपेठचे प्रशांत चव्हाण, नीलेश बाविस्कर, राहुल चौधरी, गुरुबक्ष तडवी, नंदलाल परदेशी, शहरचे विनोद वीतकर, शंकर पाटील, समाधान पाटील, सोपान पाटील यांचा सहभाग होता़ दरम्यान, हॉटेल मालक युवराज पाटील व ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरूच होती़.
साध्या वाहनातून टाकली धाड
पोलीस आल्याची माहिती जुगाऱ्यांना कळू नये यासाठी भुसावळातून निघालेल्या पथकाने तीन साध्या वाहनांचा वापर केला त्यामुळे जुगाऱ्यांना पोलीस कारवाईचा सुगावा लागला नाही़ दरम्यान, बुधवारीदेखील पोलीस पथकाने या हॉटेलची टेहळणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Junk's bail plea dismissed: 32 accused