विद्यार्थिनीने घेतली इमारतीवरुन उडी

By Admin | Updated: December 4, 2015 01:00 IST2015-12-04T01:00:25+5:302015-12-04T01:00:25+5:30

एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने गुरुवारी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या तिस:या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रय} केला.

Jump from the building taken by the student | विद्यार्थिनीने घेतली इमारतीवरुन उडी

विद्यार्थिनीने घेतली इमारतीवरुन उडी

जळगाव : प्रेमप्रकरणाबाबत मित्र व मैत्रीण यांच्याकडून होत असल्याच्या छळाला कंटाळून अॅड.सीताराम (बबनभाऊ) आनंदरामजी बाहेती महाविद्यालयातील बारावीतील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने गुरुवारी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या तिस:या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रय} केला. त्यात तिच्या पायाला दुखापत झाली. रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.

दप्तर व चप्पल बाजूला ठेवून गॅलरीतून घेतली उडी

मृण्मयी (विद्यार्थिनीचे नाव बदलले आहे) ही बाहेती महाविद्यालयात बारावी (शास्त्र शाखेचे) शिक्षण घेत आहे. गुरुवारी ती सकाळीच महाविद्यालयात आली. तेथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरू होत्या. वर्गात विद्यार्थी पेपर लिहीत असताना मृण्मयी ही तिस:या मजल्यावर गेली. तेथे तिने दीड पानाची आत्महत्यापूर्व चिठ्ठी लिहिली. त्यानंतर दप्तर व चप्पल बाजूला ठेवून गॅलरीतून उडी घेतली.

रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले

कोणीतरी इमारतीवरून पडल्याचे लक्षात येताच प्रचंड धावपळ उडाली. विद्यार्थी, प्राचार्य अनिल लोहार, प्रा.एस.एन.गुप्ता, अभिजीत रंधे यांनी तातडीने तिला रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले.

पाय फ्रॅर

घटना समजताच मृण्मयीचे वडील व आई यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी तेथून तिला तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले. या अपघातात तिचा पाय फ्रॅर झाला असून शरीराच्या इतर भागांनाही मुका मार बसला आहे. गंभीर दुखापत असली तरी तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. तिचे वडिल मनपा कर्मचारी आहेत.

घटनास्थळावर आढळली आत्महत्यापूर्व चिठ्ठी व मोबाईल

घटनास्थळावर मृण्मयीचा मोबाईल व आत्महत्यापूर्व चिठ्ठी आढळून आली. ती व मोबाईल हा प्राचार्यानी ताब्यात घेतला आहे. तसेच वरच्या मजल्यावर तिची बॅग, ओळखपत्र, पर्स व चप्पल पडून होते. प्रारंभी वरच्या मजल्यावर बसली असताना पाय घसरुन ती खाली पडल्याची चर्चा होती. आत्महत्यापूर्व चिठ्ठीवरून आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.

पालक म्हणतात मृण्मयीला आजार

मृण्मयी हिला आजार होता व त्यामुळे तिच्यावर दवाखान्यात उपचार सुरू होते असे तिच्या पालकांनी प्राचार्याना सांगितले. कोणाशी काही वाद होता का? यावरही त्यांनी माहिती नसल्याचेच सांगितल्याचे प्राचार्य लोहार यांनी स्पष्ट केले. तिने लिहिलेली आत्महत्यापूर्व चिठ्ठी प्राचार्य यांनी नंतर जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात दिली. पालकांनीदेखील पोलीस ठाण्यात जाऊन चिठ्ठीची माहिती घेतली. रात्री उशीरार्पयत या घटनेसंबंधी पोलिसात कुठलीही नोंद झालेली नव्हती, अशी माहिती मिळाली.

 

Web Title: Jump from the building taken by the student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.