निवृत्ती महाराज यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 17:33 IST2017-07-04T17:33:15+5:302017-07-04T17:33:15+5:30
मुक्ताईनगरातील भाविकांमध्ये आनंद

निवृत्ती महाराज यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर
ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.4 -महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा वर्ष 2016-17 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार पंढरपूर येथील श्री संत मुक्ताई मठाचे गादीपती हभप निवृत्ती महाराज वक्ते यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
निवृत्ती महाराज वक्ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक व मुक्ताई चित्रकार म्हणून परिचित आहे. बुलढाणा जिल्ह्यातील टाळकी या छोटय़ा खेडय़ात सधन शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण चौथी पयर्ंत करून वयाच्या 11 वर्षी मुक्ताईनगर पायी वारी केली. पुढे चातुर्मासात पंढरपूर येथे तत्कालीन विद्वान मंडळीकडे अनेक ग्रंथ पुराण वेद दर्शन शास्त्राचे अध्ययन केले. अनेक ग्रंथाचे अभ्यासपूर्ण लिखाण करून वारकरी संप्रदाय विचार प्रसार कार्य वयाच्या 89 व्या वषीर्ही अविरतपणे करीत आहे. त्यांचे मुक्ताई चरित्र ,संत ज्ञानेश्वर दिग्विजय, संत तुकाराम महाराज वैकुंठगमन, विठ्ठल पंचक हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. पंढरपूरातील मुक्ताई मठात विद्यादान आजही सुरू असून महाराष्ट्रात शेकडो कीर्तनकार त्यांनी घडविले आहेत.