शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

झाली मुक्ताबाई स्वरुपाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 11:38 PM

संत मुक्ताबाई पालखीचे सोमवारी जुन्या मंदिरातून नव्या मंदिरात प्रस्थान झाले.

ठळक मुद्देसंत मुक्ताई पालखीचा प्रस्थान सोहळा उत्साहातआषाढी वारीसाठी ३० दिवस आधी मुक्ताई पालखीचे नियमाप्रमाणे सोमवारी सकाळी प्रस्थान.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर  :  वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l

झाली मुक्ताबाई स्वरुपाकार l

असा जयजयकार करीत संत मुक्ताबाई पालखीचे सोमवारी जुन्या मंदिरातून नव्या मंदिरात प्रस्थान झाले. "कोरोना महामारी चे सावट जगा वरून जाऊदे शेतकऱ्यांना बळ मिळूदे" असे साकडे मुक्ताईचरणी घालण्यात आले. 

आषाढी वारीसाठी ३० दिवस आधी मुक्ताई पालखीचे नियमाप्रमाणे सोमवारी सकाळी प्रस्थान झाले. राज्याचे पाणी पुरवठा  मंत्री गुलाबराव पाटील यांनी कोथळी येथील संत मुक्ताबाई मूर्ती व पालखीचे पूजन केले.  ही पालखी येत्या १८ जुलैपर्यंत मुक्ताईनगर येथील नवीन मुक्ताई मंदिरात मुक्कामी थांबणार आहे. 

 वारी हा संस्कार सोहळा आहे. भक्ती, शिस्त व शक्तीचे चालते - बोलते विद्यापीठ म्हणजे वारी असल्याची भावना मंत्री  पाटील यांनी व्यक्त केली.मान्यवरांनी धरला  ठेका टाळमृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा प्रस्थानप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, ॲड. रोहिणी खडसे -खेवलकर,  रवींद्र हरणे महाराज यांनी टाळमृदुंगाच्या गजरात ठेका धरला. तीर्थक्षेत्र व पर्यटन विभागाच्या माध्यमातून मुक्ताई मंदिर परिसराला ११० कोटी रुपयांच्या कामांना तत्त्वतः मंजुरी मिळाली असून त्यात त्यातील बहुतांशी कामे ही पूर्ण झाली असल्याचे खडसे यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समिती सभापती सुवर्णा साळुंखे, राकॉ. तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस ईश्वर रहाणे ,विशाल महाराज खोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.  आभार उद्धव जुनारे महाराज यांनी मानले. 

टॅग्स :JalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगरPandharpurपंढरपूर