जळगाव : पुणे येथून जळगावला आल्यानंतर एस.टी.बसमधून उतरताच आकाशवाणी चौक परिसरातून राहूल सुरेश माळी (रा.आसोदा, ह.मु.पुणे) यांच्या बॅगेतून पत्नीची पर्स व त्यातील ७२ हजाराचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना उघड झाली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.राहूल माळी हा तरुण पुणे येथे नोकरीला आहे. दिवाळीसाठी पत्नी प्रियंकासोबत ते २६ आॅक्टोबर रोजी बसने पुणे यथून जळगावकडे यायला निघाले. २७ रोजी मध्यरात्री १ वाजता बस आकाशवाणी चौकात आल्यावर हे दाम्पत्य तेथे उतरले. मेहुणे सचिन महाजन यांच्यासोबत त्यांच्या कारने ते भूषण कॉलनीत गेले. तेथे बॅगा तपासल्या असता एका बॅगेती पर्स गायब झाली होती. या पर्समध्ये ३९ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत, १० हजार रुपये किमतीचे कानातले दागिने, २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, २ हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजन व सातशे रुपये रोख असा ७१ हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज गायब झाला होता. ही पर्स नेमकी आकाशवाणी चौकातून चोरी गेली की, भूषण कॉलनीतून की बसमधूनच हे स्पष्ट झाले नाही, मात्र रामानंद नगर पोलिसात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
बसमधून उतरताच लांबविली दागिन्यांची बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 21:10 IST