जय आदिवासी शिष्टमंडळाने घेतली विधानसभा उपाध्यक्षांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST2021-07-26T04:15:10+5:302021-07-26T04:15:10+5:30

या भेटीदरम्यान आदिवासी विभागातील रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले. पं. दीनदयाळ ...

Jay Tribal delegation met the Deputy Speaker of the Assembly | जय आदिवासी शिष्टमंडळाने घेतली विधानसभा उपाध्यक्षांची भेट

जय आदिवासी शिष्टमंडळाने घेतली विधानसभा उपाध्यक्षांची भेट

या भेटीदरम्यान आदिवासी विभागातील रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले.

पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना व आदिवासी वसतिगृह योजना यांची थकीत डीबीटी रक्कम तत्काळ अदा करण्यात यावी, वसतिगृह प्रवेश अर्ज सादर केलेल्या सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १०० टक्के प्रवेश द्यावा, अनुसूचित जमाती संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन अभिछात्रवृत्ती देण्यात यावे, पालघर पेसा कायदा शिक्षक भरतीप्रक्रिया राबविण्यात यावी, आदी विषयावर सविस्तर चर्चा होऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव जगन्नाथ वरठा, सहसचिव प्रा. बबलू गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता दिनेश पावरा, उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मफतलाल पावरा, पालघर जिल्हा प्रभारी प्रसाद पराड, औरंगाबाद जिल्हा प्रभारी बापूसाहेब गोरे, जिल्हा उपाध्यक्ष आरिफ तडवी, सहसचिव बाळासाहेब निकम, औरंगाबाद जिल्हा कोषाध्यक्ष रामदास गवळी, जनार्दन गोरे, जळगाव जिल्हा प्रभारी व संरक्षक सुलतान तडवी, जामनेर तालुका प्रभारी नाजीम तडवी, सदस्य अरमान तडवी, सुरेश मालचे, कुंदन गांगुर्डे, भगवान खिल्लारी, शरद पोटकुले, प्रशांत गावंडे, बाळाभाऊ आदी उपस्थित होते.

Web Title: Jay Tribal delegation met the Deputy Speaker of the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.