काँग्रेस भवनात 'जय भवानी'चा जयघोष
By Admin | Updated: October 6, 2014 10:49 IST2014-10-06T10:49:01+5:302014-10-06T10:49:01+5:30
युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मानसिंग सोनवणे व इतर सात कार्यकर्त्यांनी स्वकीयांवर नाराजीची तोफ डागत रविवारी काँग्रेस भवन व परिसरात जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या.

काँग्रेस भवनात 'जय भवानी'चा जयघोष
>नाराजी : युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शिवसेनेत
जळगाव : युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मानसिंग सोनवणे व इतर सात कार्यकर्त्यांनी स्वकीयांवर नाराजीची तोफ डागत रविवारी काँग्रेस भवन व परिसरात जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या व राजेश जैन यांच्या उपस्थितीत ७, शिवाजीनगर येथे शिवसेनेत प्रवेश केला. तेथे त्यांचे स्वागत करण्यात आले.
शांतीबन अपार्टमेंटमधून काँग्रेसचा कारभार सुरू आहे. अँड.सलीम पटेल व इतर मंडळी कार्यकर्त्यांना समजून घेत नाही. नाराजी प्रचंड वाढली, पण दुर्लक्ष करण्यात आले. कार्यकर्त्यांना राबविले गेले. एकाधिकारशाहीला कंटाळून काँग्रेसचा राजीनामा दिला. -मानसिंग सोनवणे जळगाव : युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मानसिंग सोनवणे व इतर सात कार्यकर्त्यांनी स्वकीयांवर नाराजीची तोफ डागत रविवारी काँग्रेस भवन व परिसरात जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या व राजेश जैन यांच्या उपस्थितीत ७, शिवाजीनगर येथे शिवसेनेत प्रवेश केला. तेथे त्यांचे स्वागत करण्यात आले. काँग्रेस उमेदवाराकडून कार्यकर्ते, पदाधिकार्यांना विश्वासात न घेता हॉस्पिटलमधील कर्मचार्यांचा प्रत्येक कामात वापर केला जात आहे. पदाधिकार्यांना देखील विश्वासात घेतले जात नसून प्रत्येक काम उमेदवार स्वत:च करू इच्छीत असल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते वैतागले आहेत. या नाराजीचा फटका मात्र काँग्रेसला बसणार आहे.
त्याचा प्रत्यय रविवारी मानसिंग सोनवणे यांनी रविवारी काँग्रेस भवनात घातलेल्या गोंधळानंतर आला. आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस भवनात आलेल्या सोनवणे यांनी महानगराध्यक्ष डॉ.भंगाळे यांच्याशीही चर्चा केली. त्यात उमेदवार सन्मानाने वागवित नाही. विश्वासात घेत नाही. अगदी कुठल्याही गोष्टीत विश्वास न ठेवता स्वत:च ती गोष्ट करून घेण्याकडे कल असतो. त्यामुळे पदधिकारी, कार्यकर्त्यांना हा अविश्वास सहन होण्याच्या पलिकडे गेला असल्याची भावना सोनवणे यांनी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळेच शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
अन्य पदाधिकारी उघडपणे अशी भूमिका घेत नसले तरी त्यांच्या बोलण्यातून नाराजीची भावना जाणवत आहे. मानसिंग सोनवणे व काही कार्यकर्ते नाराजी व्यक्त करण्यासाठी रविवारी दुपारी काँग्रेस भवनात आले. जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकार्यांबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. काही नाराज पदाधिकार्यांनी काँग्रेस भवनात जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. जोरदार गोंधळ काँग्रेस भवनात झाला. ही बाब इतर पदाधिकार्यांना माहीत झाली. जिल्हाध्यक्ष अँड.संदीप पाटील व इतर पदाधिकार्यांनी सोनवणेंसह इतरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु सोनवणे यांनी आपला राजीनामा काँग्रेसच्या कार्यालयात सादर केला.
राजेश जैन यांच्याकडून स्वागत
सोनवणेंसह इतर कार्यकर्ते ७, शिवाजीनगर या आमदार सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी पोहोचले. राजेश जैन व सेनेच्या इतर पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सोनवणेंसह विश्वास सपकाळे, दिनेश जाधव, अर्जुन भारूळे, पंकज सपकाळे, योगेश पाटील, देवेंद्र पाटील आणि बसपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास भालेराव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
तसेच शनिपेठ भागातील महाराणा प्रताप युवा मंडळाच्या ६0 ते ६५ जणांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती मिळाली. मानसिंग सोनवणे यांना शिवसेनेने अजून कोणतेही पद दिलेले नसल्याची माहिती मिळाली.