मद्य दुकानांविरुद्ध जनआधार पार्टी आक्रमक

By Admin | Updated: May 18, 2017 17:52 IST2017-05-18T17:52:44+5:302017-05-18T17:52:44+5:30

मद्य दुकाने सुरू करण्यासंदर्भात सत्ताधा:यांसह मुख्याधिका:यांचे समर्थन असल्याची टीका

Janadhar Party aggressor against liquor shops | मद्य दुकानांविरुद्ध जनआधार पार्टी आक्रमक

मद्य दुकानांविरुद्ध जनआधार पार्टी आक्रमक

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव, दि. 18  - भुसावळ शहरातील मद्य दुकाने सुरू करण्यासंदर्भात सत्ताधा:यांसह मुख्याधिका:यांचे समर्थन असल्याची टीका जनआधार विकास पार्टीने करीत प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना गुरुवारी निवेदन दिल़े
शहरातील दारू दुकाने बंद झाल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी राजकीय स्तरावरून प्रयत्न सुरू झाले आहेत़ या प्रकारामुळे शहराचे सर्वत्र नाव बदनाम होत आह़े नगरपालिकेकडे रस्ते  अवर्गीकृत झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आह़े
निवेदनावर गटनेता उल्हास पगारे, जगन सोनवणे, सचिन पाटील, सिकंदर खान, राहुल बोरसे, दुर्गेश ठाकूर आदींच्या सह्या आहेत़

Web Title: Janadhar Party aggressor against liquor shops