जामनेरला कामचुकार ‘अप्पांना’ बीडीओंचा दणका
By Admin | Updated: March 25, 2017 18:23 IST2017-03-25T18:23:28+5:302017-03-25T18:23:28+5:30
दिलेले कामे वेळेवर पूर्ण करण्यात दिरंगाई केली जात असल्याने गटविकास अधिका:यांनी तालुक्यातील 14 ग्रामसेवकांवर कारणे नोटीस तर एका ग्रामसेवकावर निलंबनाचे अस्त्र उगारले.

जामनेरला कामचुकार ‘अप्पांना’ बीडीओंचा दणका
जामनेर, दि. 25- जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात वेळेवर कामे पूर्ण न करणा:या 14 ग्रामसेवकांना गटविकास अधिका:यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून एका ग्रामसेवकाला निलंबित केले आहे.
दिलेले कामे वेळेवर पूर्ण करण्यात दिरंगाई केली जात असल्याने व वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याने गटविकास अधिका:यांनी तालुक्यातील 14 ग्रामसेवकांवर कारणे नोटीस तर एका ग्रामसेवकावर निलंबनाचे अस्त्र उगारले. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.