जामनेरला आंदोलक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST2021-06-27T04:12:18+5:302021-06-27T04:12:18+5:30

जामनेर : भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी नगरपालिका चौकात रास्ता रोको केला. रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात ...

Jamnerla protesters detained | जामनेरला आंदोलक ताब्यात

जामनेरला आंदोलक ताब्यात

जामनेर : भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी नगरपालिका चौकात रास्ता रोको केला. रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.

पालिका कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. नगराध्यक्ष साधना महाजन, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील व नगरसेविका उपस्थित होते.

तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, अतिश झाल्टे, रवींद्र झाल्टे, वासुदेव घोंगडे, गोविंद अग्रवाल, तुकाराम निकम, राजधर पांढरे, बाबुराव घोंगडे, नवल पाटील, रमण चौधरी, महेंद्र बाविस्कर, अनिस शेख, नाजीम शेख, राजेंद्र चौधरी, गोपाळ निकम यांना ६८ प्रमाणे ताब्यात घेऊन कलम ६९ प्रमाणे सोडण्यात आले.

Web Title: Jamnerla protesters detained