जामनेरला टोमॅटो 80 रुपये किलो

By Admin | Updated: July 7, 2017 11:58 IST2017-07-07T11:58:26+5:302017-07-07T11:58:26+5:30

पाऊस लांबल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे.

Jamner tomatoes 80kg | जामनेरला टोमॅटो 80 रुपये किलो

जामनेरला टोमॅटो 80 रुपये किलो

 ऑनलाईन लोकमत

जामनेर,दि.7 - : पाऊस लांबल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. जामनेर येथील आठवडे बाजारात गुरुवारी टोमॅटो 80 रुपये किलो या दराने विकले गेले.
 जामनेर बाजारात चवळी, गवार, हिरवी मिरची आदी भाज्यांचे दर वाढले आहेत. गुरुवारी येथील आठवडे बाजार असतो. स्थानिक व ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठय़ा संख्येने येतात. भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना 80 रुपये किलो दराने विकल्या जाणा:या टोमॅटोचे भाव ऐकून धक्काच बसला. यंदा पावसाचा लहरीपणा जाणवत असून तो यापुढे वेळेवर आणि पुरेसा आला नाही तर बाजारात भाजीपाला आणखी महाग होण्याची शक्यता बोलली जात आहे.
 

Web Title: Jamner tomatoes 80kg