जामनेर तालुक्याला श्रावणातील पावसाने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST2021-09-06T04:21:41+5:302021-09-06T04:21:41+5:30
जामनेर : श्रावणाच्या शेवटच्या टप्प्यात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर, सूर व सोन या नद्यांना पूर आले. अजिंठा ...

जामनेर तालुक्याला श्रावणातील पावसाने दिलासा
जामनेर : श्रावणाच्या शेवटच्या टप्प्यात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर, सूर व सोन या नद्यांना पूर आले. अजिंठा डोंगर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे तोंडापूर प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने वाढ होत आहे.
शेंदुर्णीच्या सोन नदीला काल आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी नदी काठावर गर्दी केली होती. सोननदीला घाटमाथ्यावर सोयगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री सोननदीला मोठा पूर आला. रात्री अचानक आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मध्यरात्री १ वाजता शेंदुर्णीत मुसळधार पाऊस झाला. पोळ्याचा सणाच्या निमित्ताने आलेल्या या पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फोटो कॅप्शन १) शेंदुर्णीत सोन नदीला आलेला पूर. २) तोंडापूर मध्यम प्रकल्पात वाढलेला जलसाठा.
050921\05jal_18_05092021_12.jpg
जामनेर तालुक्याला श्रावणातील पावसाने दिलासा