जामनेरने गाठला एक लाख लसीकरणाचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:36+5:302021-09-05T04:20:36+5:30
जामनेर : आरोग्य विभागाकडून तालुक्यासाठी शनिवारी ११ हजार ८०० लसींचा साठा मिळाल्याने शहरी व ग्रामीण भागात नागरिकांनी उत्साहात लसीकरण ...

जामनेरने गाठला एक लाख लसीकरणाचा टप्पा
जामनेर : आरोग्य विभागाकडून तालुक्यासाठी शनिवारी ११ हजार ८०० लसींचा साठा मिळाल्याने शहरी व ग्रामीण भागात नागरिकांनी उत्साहात लसीकरण करून घेतले. सुमारे ९१ हजार २०३ नागरिकांचे आजपर्यंत लसीकरण झाले असून एकूण पात्र लोकसंख्येच्या तुलनेत २५ टक्के लसीकरण झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले.
आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून नगरपालिकेने बाबाजी राघो मंगल कार्यालयात लसीकरण मोहीम राबवली. नगराध्यक्ष साधना महाजन, नगरसेवक व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तालुक्यात प्रभावीपणे लसीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, जि.प.चे शिक्षक,
ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांची मदत घेण्यात आली.
आजपर्यंतचे लसवंत
पहिला डोस- ६८ हजार २१६.
दुसरा डोस- २२ हजार ९८७
एकूण लसीकरण - ९१ हजार २०३
जामनेर उपजिल्हा रुग्णालय, पहूर ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र असे २८ ठिकाणी लसीकरण करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे, डॉ. हर्षल चांदा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे व प्राथमिक आराेग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी यासाठी मेहनत घेतली.
040921\04jal_16_04092021_12.jpg
मांडवे (ता.जामनेर) उपकेंद्रात लसीकरणासाठी लागलेली रांग