जामनेर पं.स. गट नेत्याच्या राजीनाम्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:56 IST2021-01-05T17:56:23+5:302021-01-05T17:56:41+5:30
जामनेर पं.स. गट नेत्याच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे.

जामनेर पं.स. गट नेत्याच्या राजीनाम्याने खळबळ
जामनेर : पंचायत समितीतील भाजपचे गटनेते अमर पाटील यांनी मंगळवारी सदस्य पदाचा राजीनामा सहायक प्रशासन अधिकारी के.बी.पाटील यांचेकडे दिला. ग्रामपंचायत निवडणूक काळात त्यांनी राजीनामा दिल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
जामनेर पं.स.तील कारभाराबाबत यापूर्वीसुध्दा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. पदाधिकाऱ्यांना अधिकार मिळत नसल्याची खंत त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती. पं.स.चा कारभार भाजपतीलच एक ज्येष्ठ नेता चालवत असल्याने याबाबत पाटील नाराज होते.
हिवरखेडे बुद्रूक ग्रा.पं.चे ते माजी सरपंच व भाजपायुवा मोर्चाचे माजी अध्यक्ष होते.
हिवरखेडे बुद्रूक ग्रा.पं.ची निवडणूक होत असून, या काळात त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय गोटात खळबळ निर्माण झाली आहे. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.