जामनेर पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 00:08 IST2019-10-01T00:08:41+5:302019-10-01T00:08:45+5:30

जामनेर : चाळीसगाव पोलीस स्टेशनला मच्छिंद्र शिवराम राठोड (रा. नागन तांडा, ता.कन्नड) या आरोपीवर चोरीचा गुन्हा दाखल असून आरोपी ...

 Jamner police chase cinestyle | जामनेर पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग

जामनेर पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग



जामनेर : चाळीसगाव पोलीस स्टेशनला मच्छिंद्र शिवराम राठोड (रा. नागन तांडा, ता.कन्नड) या आरोपीवर चोरीचा गुन्हा दाखल असून आरोपी राठोड फरार होता. त्यास जामनेर पोलिसांनी पकडून चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदर आरोपी जामनेरमध्ये असल्याची गोपनीय माहिती सोमवारी सकाळी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना मिळाली. सहाय्यक फौजदार ईस्माइल शेख, प्रदीप पोळ हे पेट्रोलिंग करीत असताना आरोपी राठोड यास ताब्यात घेऊन निघाले. आरोपीने श्रीराम मार्केट परिसरात पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी प्रदीप पोळ यांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत आरोपीस पकडून चाळीसगाव पोलिसांकडे दिले.

 

Web Title:  Jamner police chase cinestyle