शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर : सलग पाचव्या दिवशी पाऊस, तुफान वादळामुळे रिक्षाच उडाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 23:19 IST

जामनेर येथे पेट्रोल पंपाचे छत कोसळले

मोहन सारस्वतजामनेर (जि. जळगाव) : जिल्ह्याच्या अनेक भागात रविवारी सायंकाळी पावसाने धुमाकूळ घातला. जामनेर शहरात रविवारी सायंकाळी ७:३० वाजता अचानक जोरदार वादळासह गारांचा पाऊस झाला.  वादळाच्या तडाख्याने रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. व्यापारी संकुलासमोर लावलेल्या दुचाकी वाऱ्याच्या वेगाने फेकल्या गेल्या. रस्त्यांवर गारांचा खच साचला होता. वेगवेगळ्या घटनेत १० ते १५ जण जखमी झाले.  सोनाळा फाटा येथील एका शेतातील अनेक शेळ्या गारपीटीमुळे ठार झाल्या आहेत. 

सायंकाळी  देऊळगांव गुजरी, फत्तेपूर, वाकडी, शहापूर भागात जोरदार पाऊस झाला. सलग पाचव्या दिवशी वळवाचा तालुक्यात कहर सुरुच होता. जामनेरपुरा भागात वादळामुळे रिक्षा उडून जवळच्या नाल्यात पडली. सोनबर्डी टेकडीवरुन खाली उतरत असलेली रिक्षा वादळामुळे उलटली. यात ३ जण जखमी झाले. उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरणासाठी बनविलेले पत्र्याचे शेड उडाले, सुदैवाने कुणीही जखमी नाही. बिस्मील्ला नगर, शास्त्रीनगरसह इतर भागातील सुमारे ६० घरांवरील पत्रे उडाल्याचे सांगण्यात आले.

पहूर ता. जामनेर येथे  पेट्रोल पंपाचे छत कोसळले आहे. यात एक दुचाकी दाबली गेली. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने मोठी जीवितहानी टळली आहे. चांगदेव ता. मुक्ताईनगर येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास आलेल्या तुफानी वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे चांगदेव परिसरात अवघ्या दहा मिनिटात होत्याचे नव्हते झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव