एसटी कर्मचाऱ्याची जामनेरला आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 18:12 IST2019-07-20T18:12:09+5:302019-07-20T18:12:43+5:30
घटनेमागील कारण गुलदस्त्यात

एसटी कर्मचाऱ्याची जामनेरला आत्महत्या
जामनेर : सम्राट नगर मधील रहिवासी जितेंद्र बाबुराव नेवरे (४५) यांनी शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नेवरे हे धुळे एस.टी. आगारात हेल्पर म्हणुन कार्यरत होते. सुटी घेऊन नेवरे घरी आले होते. गळफास घेतल्यावर त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ व ४ मुली आहेत. डॉ. प्रशांत महाजन यांच्या खबरीवरुन या घनेबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. घटनेमागील कारण मात्र समजू शकले नाही.