भूसंपादनाचा मोबदला मिळत नसल्याने कोल्हे येथील शेतकऱ्यांचे जामनेरला उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 16:06 IST2019-07-25T16:06:29+5:302019-07-25T16:06:53+5:30
न्याय मिळण्याची मागणी

भूसंपादनाचा मोबदला मिळत नसल्याने कोल्हे येथील शेतकऱ्यांचे जामनेरला उपोषण
जामनेर : शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील मिळत नसल्याने कोल्हे, ता.पाचोरा येथील काही शेतकऱ्यांनी गुरुवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा मतदार संघ असलेल्या जामनेर येथील तहसील कार्यालय समोर लाक्षणिक उपोषण केले.
उपोषणात कैलास मुरलीधर पाटील, श्रावण दगडू पाटील, संजय प्रल्हाद पाटील, मंगल सुभाष जाधव व नामदेव माळी यांंचा सहभाग होता. मोबदला मिळणेबाबत संबांधित शेतकºयांनी जळगाव येथील लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व विशेष भूसंपादन अधिकारी यांचेकडे वेळोवेळी मागणी केली. लोकशाही दिनात जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज सादर केले. तरीही मोबदला मिळत नसल्याने जामनेरला लाक्षणिक उपोषण केले. सोमवारी २९ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व ३१ जुलैला मंत्रालयासमोर उपोषण करणार असल्याचे या शेतकºयांनी सांगितले. या नतंरही मोबदला न मिळाल्यास १४ आॅगस्टला दिल्ली येथे संसद भवनासमोर उपोषण करणार असल्याची माहिती या शेतकºयांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिली आहे.