वाहतूक पोलिसांनी लावलेले जॅमर रिक्षा चालकाने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:17 IST2020-12-06T04:17:02+5:302020-12-06T04:17:02+5:30
शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी मंगेश पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकाजवळ बेशिस्तपणे पार्कींग केलेल्या रिक्षाला (क्र.एम.एच ...

वाहतूक पोलिसांनी लावलेले जॅमर रिक्षा चालकाने लांबविले
शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी मंगेश पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकाजवळ बेशिस्तपणे पार्कींग केलेल्या रिक्षाला (क्र.एम.एच १९ सी.डब्ल्यू ३४५०)जॅमर लावले होते. लावण्यात आले होते. यानंतर रिक्षाचालक सोनू नंदू लोहाळेकर याने विशाल एकनाथ पवार याच्या मदतीने जॅमर काढून नेले. हा प्रकार उघडकीस आल्यावर मंगेश पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.तपास हवालदार चंद्रकांत पाटील करीत आहे.
मुलासह आईला चौघांकडून बेदम मारहाण
जळगाव : तालुक्यातील कानळदा येथे किरकोळ कारणावरुन रजिया मजीद पिंजारी (वय ४५) व त्यांचा मुलगा फारुख यांना चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शनिवारी रविंद्र सपकाळे, पुरुषोत्तम बुधो सपकाळे, अंजनाबाई पुरूषोत्तम सपकाळे व नरेंद्र पुरुषोत्तम सपकाळे (सर्व रा.कानळदा) यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फारुख पिंजारी याने खुन्नसने का पाहतो याचा रवींद्र सपकाळे याला जाब विचारला असता, त्याचा राग आल्याने त्यावरुन लोखंडी सळईने मारहाण झाली. रजीया पिंजारी यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक कदीर तडवी करीत आहे.