जळोद येथील ड्रायव्हरचा मुलगा बनला ‘आरटीओ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 21:29 IST2019-09-14T21:29:50+5:302019-09-14T21:29:58+5:30
अमळनेर : तालुक्यातील जळोद येथील रहिवासी असलेल्या एका खासगी वाहन चालकाचा मुलगा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून यश मिळवत आरटीओ ...

जळोद येथील ड्रायव्हरचा मुलगा बनला ‘आरटीओ’
अमळनेर : तालुक्यातील जळोद येथील रहिवासी असलेल्या एका खासगी वाहन चालकाचा मुलगा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून यश मिळवत आरटीओ बनला.
गेल्या ४० वर्षांपासून ड्रायव्हिंग करत असलेले प्रकाश गोपीचंद चौधरी यांचा मोठा मुलगा तर जळोदचे सरपंच डॉ.जितेंद्र चौधरी यांचा पुतण्या जगदीश प्रकाश चौधरी या २८ वर्षीय तरुणाने घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाची जिद्द सोडली नाही. त्यांची एमपीएससीमध्ये स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पास होत आरटीओ अधिकारी म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे. पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे व वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुभाष चौधरी व सर्व सदस्य यांच्यातर्फे जगदीश यांचे कौतुक करण्यात आले.