शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जळगाव मनपा निवडणूक : मतदानाला पैसे वाटप व हाणामारीचे गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 13:27 IST

आचारसंहिता भंगच्या २५ तक्रारी

ठळक मुद्देगेंदालाल मील, शिवाजीनगरात हाणामारीधमकी दिल्याने गुन्हा दाखल

जळगाव : महानगरपालिकेसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसला तरी गेंदालाल मील, शिवाजी नगर, दूध फेडरेशन, जानकी नगर या भागात किरकोळ हाणामारीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी खुलेआम पैशांचे वाटप झाले. समता नगर परिसरातील स्टेट बॅँक कॉलनीच्या मागे तर भुसावळ येथील नगरसेवकाच्या कारमध्येच उमेदवाराने पैसे पकडले. त्यामुळे या निवडणुकीला हाणामारी व पैसे वाटपाचे गालबोट लागले. प्रभाग १६ मध्ये तर एका उमेदवाराने मतदारांना पैशांचे आमिष दिले मात्र मतदानानंतर पैसे न दिल्याच्या आरोपावरुन महिलांनी त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. पैसे वाटप करताना अनेक उमेदवारांनी प्रशासनाचा धाक बाळगलाच नाही. किंबहूना प्रशासकीय व पोलीस यंत्रणेने देखील पैसे वाटपाची प्रक्रिया रोखण्याची तसदी घेतली नाही.प्रिया कोल्हे यांना धमकी दिल्याने गुन्हा दाखलसेंट लॉरेन्स स्कूलच्या मतदान केंद्रात चार चाकीमधून जेवण तसेच भांडे नेत असताना त्याचा जाब विचारणाऱ्या राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रिया अमोल कोल्हे (वय २३, रा.ईश्वर कॉलनी, जळगाव) यांना अश्लिल शिवीगाळ करुन हात पिरगळत, उद्याची निवडणूक होऊ दे तुला व तुझ्या नातेवाईकांना पाहून घेवू अशी धमकी दिल्याचा प्रकार ईश्वर कॉलनीत घडला. याप्रकरणी बुधवारी पहाटे कुंदन काळे, चंद्रशेखर अत्तरदे, दीपक चौधरी, दिनेश अत्तरदे व इतर ७ ते ८ जण यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला भादवि कलम १४३, ५०९,५०४, ५०६ पोलीस अधिनियम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कर्मचाºयांना सरबराईद्वारे लाच दिल्याप्रकरणी गुन्हासेंट लॉरेन्स शाळेच्या मतदान केंद्रात ड्युटीला असलेले अधिकारी, कर्मचारी यांना पोळी, भाजी, कांदा, लिंबू असे जेवणाचे साहित्याची सरबराईद्वारे लाच देण्याचा प्रयत्न केला म्हणून चार चाकी गाडी क्र.एम.एच.१९ ए.एक्स. ११०९ वरील चालक व त्याच्यासोबत असलेला आणखी एक अशा दोघांविरुध्द एमआयडीसी पोलिसात भादवि कलम १७१ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. मनपाचे शाखा अभियंता मिलिंद काशिनाथ जगताप यांनी फिर्याद दिली आहे.बोगस मतदानाचा प्रयत्न मेहरुणमध्ये एकास अटकबोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाºया रवींद्र बबनराव जाधव (वय २८, रा. जोशी वाडा, जळगाव) याला बुधवारी सायंकाळी मेहरुणमधील के.जी.मणियार प्राथमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रात अधिकाºयांनीच पकडले. त्याला अटक करण्यात आली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मेहरुणमधील के.जी.मणियार प्राथमिक विद्यालयाच्या मतदान केंद्र क्र.१५/१ येथे दिनेश पितांबर पाटील यांची मतदान अधिकारी क्र.१ म्हणून नियुक्ती झालेली होती. सायंकाळी साडे पाच वाजता रवींद्र जाधव हा मतदान केंद्रात आला. अधिकाºयांनी ओळखपत्राची मागणी केली असता त्याच्या खिशात रवींद्र बबन जाधव, बबन सिताराम जाधव, शोभा बबन जाधव, वंदना भगवान रोकडे व दीपाली महेंद्र जाधव या पाच जणांचे ओळखपत्र आढळून आले. तसेच त्याच्या नावासमोर आधीच मतदान झाल्याची नोंद होती.नवनाथ दारकुंडे व अमोल सांगोरे समोरासमोरमतदान सुरु झाल्यानंतर तासाभरातच भाजपाचे उमेदवार नवनाथ दारकुंडे आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार अमोल सांगोरे समोरासमोर आले. त्यांच्यात चांगलाच वाद झाल्याची घटना सकाळी साडे आठ वाजता शिवाजीनगरातील मतदान केंद्रावर घडली.शिवाजीनगरकडे आपल्या कार्यकर्त्यांसोबत जाणाºया आमदार सुरेश भोळे व बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करुन, वादावर पडदा पडला.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकJalgaonजळगाव