जळगावची पाॅझिटिव्हिटी एक टक्क्याच्या खाली, तरीही निर्बंध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:59+5:302021-07-28T04:17:59+5:30
सेंट्रल डेस्कसाठी जळगाव : जिल्हाभरात कोरोना पॉझिटिव्हिटी अगदी शुन्यावर आली आहे. गेल्या महिनाभरात रोज दहापेक्षा अधिक रुग्ण समोर येत ...

जळगावची पाॅझिटिव्हिटी एक टक्क्याच्या खाली, तरीही निर्बंध कायम
सेंट्रल डेस्कसाठी
जळगाव : जिल्हाभरात कोरोना पॉझिटिव्हिटी अगदी शुन्यावर आली आहे. गेल्या महिनाभरात रोज दहापेक्षा अधिक रुग्ण समोर येत नाहीत. अशा स्थितीत कोरोना कमी झालेला असताना आता तरी व्यापार व उद्योगांना पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी व्यापारीवर्गातून होत आहे. जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी ही गेल्या दोन महिन्यांपासून एक टक्क्यांपेक्षा खालीच आहे. शहरात तर कधी शून्य, तर कधी एक किंवा दोन असेच रुग्ण समोर येत आहेत.
कोरोनाची दुसरी लाट कमी झालेली असताना शिवाय तिसऱ्या लाटेबाबत ठोस कोणीच काही सांगत नसताना अशा स्थितीत व्यापारीवर्गाला वेठीस न धरता, ते पूर्वपदावर आणावे लागणार आहे. जळगाव शहरात रुग्णसंख्या घटली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्ण आहेत तेथे निर्बंध हवेत. मात्र, जेथे नाहीत त्यांना का वेठीस धरले जातेय. शासनाने तातडीने सर्व व्यवहार पूर्वपदावर आणावेत, अशी मागणी कॅट संघटनेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष पुरूषोत्तम टावरी यांनी केली आहे. तर व्यापार संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवावे, यासाठी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांना पत्र पाठवावे, असे आवाहन महामंडळाच्यावतीने आता करण्यात आले आहे, असे जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष युसूफ मकरा यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.