शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

जळगावकरांचे प्रेम अन् पाहुणाचार भावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:33 PM

सई ताम्हणकर : तरुणाई बेधूंद

ठळक मुद्दे. तरच स्त्री सक्षम रॅम्पवॉकचे प्रात्याक्षिक
जळगाव : टाळ्या, शिटय़ांसह तरुणाईने सिने अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या प्रकट मुलाखत कार्यक्रमात प्रचंड जल्लोष केला. तर सईनेही जळगावकरांचे प्रेम आणि खान्देशी पाहुणचाराचे कौतुक करीत या शहरात येवून खूपच आनंद झाल्याचा आवजरून उल्लेख केला. येथील एकूणच वातावरणाने भारवल्याचे सांगत दिलखुलास संवाद साधला.सागर पार्क मैदानावर भरारी फाऊंडेशनतर्फे आयोजित खान्देश महोत्सवात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.पान 1 वरूनविशाल पाटील यांनी प्रकट मुलाखत घेतली. ‘टिकटिक’ने झाले स्वागत सई ताम्हणकरचे स्टेजजवळ आगमन होताच आरोळ्या आणि शिटय़ांनी तरुणाईने दाद दिली. यावेळी सईचे स्वागत करण्यासाठी ऑडीअन्सला ‘टिकटिक वाजते डोक्यात’ या गाण्याच्या ओळी गाण्याचे आवाहन करण्यात आले व स्टेजवर तिचे आगमन झाले. बहिणाबाईंची भूमीसाहित्यासाठी मोठी देण असलेल्या बहिणाबाईंच्या पावन भूमीत आल्याचा आपल्याला खूप आनंद झाला. येथील वांग्याचे भरीत खूपच आवडल्याचे सईने सांगितले. . तरच स्त्री सक्षम स्त्रीला आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीवर अवलंबून रहावे लागते. जी स्त्री आपली इच्छा स्वत: पूर्ण करु शकते, ती स्त्री सक्षम होते व तिच्यासोबतच कुटुंबही सक्षम होते. याचबरोबर दुष्काळ घालविण्यासाठी शोष खड्डे करणे आदी कामात समाजातील प्रत्येकाने पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा सईने व्यक्त केली. पाश्चात्य अनुकरण म्हणजे ‘बोल्डनेस’ नव्हे आपला प्रवास सांगली सारख्या छोटय़ा गावातून मुंबई- पुणे असा झाला. 17 वर्षाची असताना आईने आपल्याला मुंबई सारख्या शहरात करिअरसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. तिच्यातील हा बोल्डनेस माङयात आला असून पाश्चात्य गोष्टींचे अनुकरण म्हणजे बोल्डनेस नव्हे हे देखील सईने स्पष्ट केले. खरे सौंदर्य मनाचेबाह्य सौंदर्य हे काही काळच असते. खरे सौदर्य हे मनाचे आहे. म्हणून दिलको देखो. असा सल्लाही सईने तरुणांना दिला. जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने जरुर पहा पण खूप मेहनत घ्या. स्वत:वर प्रेम करा, स्वत: वर खूश रहा म्हणजे आत्मविश्वास आपोआप वाढतो असेही तिने सांगितले. चित्रपट सृष्टीत येण्यासाठी शिक्षण पूर्ण करा आणि मग पुढे आत्मविश्वासाने पाऊल टाका असा सल्लाही प्रश्नोत्तरादरम्यान दिला. बिकिनी घातली तेव्हा खूप टिका झाल्याच्या विषयावर सई म्हणाली की, अभिनेत्रिला बिकिनी आणि नऊवारी या दोन्ही पेहराव्यात सहज वावरता आले पाहिजे. रॅम्पवॉकचे प्रात्याक्षिकउपस्थित काही तरुणींना रॅम्पवॉक कसा करावा याचे प्रात्याक्षिक दाखवत त्यांच्यासोबत सईने रॅम्पवॉक करत तरुणांच्या शिट्टया मिळविल्या. याचबरोबर तिने स्वत: चित्रपटात गायलले जीव थोडा थोडा झुरतो हे गाणे गाऊन दाखवले व याच गाण्यावर नृत्य करीत तरुणांना बेधुंद केले. त्यांनी ‘कडक’ असा उल्लेख करीत प्रतिसादही दिला.