जळगावकर घेतोय दिग्गज खेळाडूंची फिरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 01:10 PM2020-01-12T13:10:29+5:302020-01-12T13:10:51+5:30

आकाश नेवे  जळगाव : ला.ना. शाळेकडून खेळणारा विद्यार्थी ते मुंबईच्या रणजी संघाचा सदस्य आणि एकाच डावात पाच आणि संपूर्ण ...

Jalgaonkar is taking the spin of the giants | जळगावकर घेतोय दिग्गज खेळाडूंची फिरकी

जळगावकर घेतोय दिग्गज खेळाडूंची फिरकी

Next

आकाश नेवे 
जळगाव : ला.ना. शाळेकडून खेळणारा विद्यार्थी ते मुंबईच्या रणजी संघाचा सदस्य आणि एकाच डावात पाच आणि संपूर्ण सामन्यात ९ गडी बाद करणारा शशांक अत्तरदे याची आता स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. मुंबईच्या संघातून खेळताना त्याने युसुफ पठाण आणि दीपक हुड्डा या अनुभवी खेळाडूंना बाद केले आहे.
जैन स्पोर्टस् अकॅडमीचा खेळाडू असलेल्या शशांक अत्तरदे हा मुंबईच्या टाईम्स शिल्ड स्पर्धेत जैन इरिगेशनच्या कार्पोरेट संघाकडून खेळायचा. त्यानंतर त्याने मुंबईच्या ए डिव्हिजन क्रिकेट सामन्यात व्हिक्टरी क्लबकडून खेळायला सुरुवात केली. बॉलिंग आॅल राऊंडर असलेल्या शशांक याने काही काळातच आपल्या खेळाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याने उजव्या हाताचा आॅफ स्पिनर असलेल्या शशांक याच्या गोलंदाजीतील अचुकता आणि भेदकता यामुळे त्याला मुंबईच्या संघात स्थान मिळाले. त्याने तीन डिसेंबर २०१९ ला मुंबईकडून रणजी संघात पदार्पण केले. त्या आधी तो विजय हजारे चषकात मुंबईकडून गोवा आणि झारखंड विरोधातील सामन्यात खेळला होता. मुंबईकडून रणजीत बडोदा संघाविरुद्ध खेळताना त्याने दोन्ही डावात प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यामुळे सहाजिकच त्याला पुढच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.
विशेष सामना
मुंबईकडून रणजीत बडोदा संघाविरुद्धचा सामना शशांक अत्तरदे याच्यासाठी विशेष ठरला. या सामन्यात मुंबईने कर्नाटकला पराभूत केले असले तरी एकट्या शशांकने मुंबईकडून खिंड लढवली. त्याने पहिल्या डावात पाच बळी घेतले. त्यात अभिमन्यु मिथून आणि श्रेयस गोपाल यांचाही समावेश होता. बडोद्याविरोधात खेळताना त्याने दीपक हुड्डा आणि युसुफ पठाण यांचे बळी घेण्याची कामगिरी केली होती.
ला.ना. सार्वजनिक विद्यालयाकडून खेळताना सुरूवातीच्या काळात त्याला क्रीडा शिक्षक दीपक आर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतरच्या काळात जैन स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये अविनाश आवारे, संदीप दहाड, मुश्ताक अली यांनी त्याच्या खेळाला पैलु पाडले. तो जळगाव जिल्हा १६ वर्षाआतील आणि १९ वर्षाआतील संघाचा कर्णधार देखील राहिला आहे.
शशांक अत्तरदे याने आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये बाहेती महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धांमध्ये तो कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कर्णधार देखील होता.
क्रिकेट खेळताना नेहमीच कुटुंबाने पाठिंबा दिला. स्पर्धांमुळे बऱ्याचदा शाळेला दांडी मारावी लागत असे, मात्र त्यावेळी आई आणि बाबांनी खेळाला प्रोत्साहन दिले. रणजीतील निवडीबद्दल असे सांगावासे वाटते की, मी मेहनत घेत होतो. मात्र निवडीचे कळाल्यानंतर स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. मुंबईच्या रणजी संघाकडून खेळणे हे एक स्वप्न होते.

Web Title: Jalgaonkar is taking the spin of the giants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव