सदृढ आरोग्यासाठी धावले जळगावकर

By Admin | Updated: July 10, 2017 16:04 IST2017-07-10T16:04:43+5:302017-07-10T16:04:43+5:30

‘सिटी रन विथ क्रांती साळवी’ उपक्रमात जळगाव रनर्स ग्रुपचा सहभाग

Jalgaonkar runs for better health | सदृढ आरोग्यासाठी धावले जळगावकर

सदृढ आरोग्यासाठी धावले जळगावकर

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.10- आरोग्यविषयक जनजागृती व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू व खान्देश कन्या क्रांती साळवी सोबत ‘सिटी रन विथ क्रांती साळवी’ चे आयोजन केले होते. या उपक्रमास जळगाव रनर्स ग्रुपमधील सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
जळगावकरांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीसाठी ‘सिटी रन’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यात सहभागी होण्यासाठी सर्व सदस्य सकाळी 6.30 वाजता सागर पार्कवर एकत्र आले. त्यानंतर ‘सिटी रन’ ला प्रारंभ झाला. सागर पार्क, काव्यर}ावली चौक, गणपती मंदिर, महाबळ चौक, काव्यर}ावली चौक मार्गे सागर पार्क येथे समारोप झाला.
आरोग्यासाठी धावणे फायदेशीर असल्याचे क्रांती साळवी यांनी सांगितले. वॉर्म अप व स्ट्रेचिंगची नवीन पद्धतचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या ‘सिटी रन’ मध्ये रनर्स ग्रुप चे 80 सदस्य हजर होते. महिलांनी या ‘सिटी रन’ मध्ये चांगला सहभाग दिला. डॉ.प्रीती अग्रवाल, प्रेमलता सिंग, डॉ.तृप्ती बढे, वेदांती किरण बच्छाव, रुपाली अविनाश काबरा, पल्लवी भैय्या, डॉ.सीमा पाटील, डॉ.सोनाली कोठावदे, डॉ.सोनाली महाजन, अंकिता कुकरेजा, डॉ.हेमांगीनी कोल्हे, कविता शास्त्री, शारदा कुकरेजा, रोशन राजपूत, वैशाली शाह, डॉ.एकता नीरज अग्रवाल यांनी सहभाग नोंदविला.

Web Title: Jalgaonkar runs for better health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.