शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनमधील सायबर ठगाकडून जळगावकरांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा, दोघांना पोलिस कोठडी

By विजय.सैतवाल | Updated: May 4, 2024 22:53 IST

या फसणूक करणाऱ्यांमध्ये मोहम्मद मसरूर इज्राईल याचा युक्रेनमध्ये राहणारा भाऊ मोहम्मद मशकूर आलम याचाही समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे.

जळगाव : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून अधिकचा नफा देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या दोघांना जळगाव सायबर पोलिसांनी अटक केली. यामध्ये क्रिप्टोकरन्सी वॉलेट वापरणारा मोहम्मद मसरूर इज्राईल याला दिल्लीतून तर बँकेचे खाते कमिशनवर देणाऱ्या अनिल कुमार याला राजस्थान येथून अटक केले. या फसणूक करणाऱ्यांमध्ये मोहम्मद मसरूर इज्राईल याचा युक्रेनमध्ये राहणारा भाऊ मोहम्मद मशकूर आलम याचाही समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे.गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फस‌णुकीचे प्रकार समोर येत आहे. यात या पूर्वी देशातील वेगवेगळ्या भागातून सायबर ठगांना पोलिसांनी अटक केली. त्यात आता या ऑनलाईन फसवणूक प्रकरणांमध्ये विदेशातूनही फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.शेअर ट्रेडिंगमध्ये तक्रारदाराला अधिकचा नफा देत नंतर गुंतवलेल्या मोठ्या रकमेवर कोणताही नफा अथवा मुद्दल रक्कम परत न दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास करीत असताना क्रिप्टोकरन्सी वॉलेट वापरणारा मोहम्मद मसरूर इज्राईल याला सायबर पोलिसांनी दिल्लीतील कपासहेडा भागातून अटक केली.

युक्रेनमधून हाताळायचा व्यवहारमोहम्मद मसरूर इज्राईल याला सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउनि दिगंबर थोरात, पोहेकॉ प्रवीण वाघ, राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, दीपक सोनवणे, पोकॉ गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी दिल्लीतून अटक केल्यानंतर त्याची चौकशी करत असताना या फस‌णूक प्रकरणात त्याचा युक्रेन येथे राहणारा भाऊ मोहम्मद मशकूर आलम याचाही समावेश असल्याचे समोर आले. मोहम्मद मशकूर हा युक्रेनमध्ये राहून ऑनलाईन पद्धतीने व्यवहार हाताळत होता. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अगोदर १४ लाख नफ्याचे अमिष नंतर कोटीत फसवणूकदुसऱ्या गुन्ह्यात तक्रारदाराला गुंतवणूक रकमेवर १४ लाख रुपयांचा नफा देत विश्वास संपादन केला. नंतर पुन्हा एक कोटी पाच लाख २३ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर मोबदला मिळत नसल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान राजस्थानमधील बाडमेर येथील अनिल कुमार याला ताब्यात घेतले. तो त्याचे करंट बँक खाते कमिशनवर गुन्हे करणाऱ्यांना पुरवित असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून मोबाइल, सीमकार्ड साहित्य जप्त करण्यात आले.अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता मोहम्मद मसरूर इज्राईल याला ६ मेपर्यंत तर अनिल कुमार याला ८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस