शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

जळगाव जि.प. समोर अतिक्रमणाविरोधात ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 12:51 IST

पुराव्यासह अहवालाची मागणी

ठळक मुद्देतारखेडा खुर्द येथील सरपंचांनी अतिक्रमण केल्याचा आरोपगट विकास अधिका-यांना पत्र देऊन पुराव्यांसह अहवाल मागितला

जळगाव : पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील सरपंचांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असतानाही गटविकास अधिकाºयांकडून चौकशीचा अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करीत सरपंचाला अभय दिले जात आहे, असा आरोप करीत त्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी बुधवारपासून जि.प.समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.यासंदर्भात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांना ग्रा.पं. सदस्य आनंदा पाटील, सुपडू पाटील आणि कलाबाई पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन देत जि.प. समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली.निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील सरपंच मधुकर पाटील यांनी अतिक्रमण केले असून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाईची मागणी सदस्यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा करण्यात आला असता, जिल्हाधिकाºयांनी चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर सदस्यांनी उपोषण सुरु करुन अतिक्रमणाबाबत पुराव्यांसह अहवाल मागितला होता. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिका-यांनी अर्धवट अहवाल आणून सदस्यांचे उपोषण सोडले होते. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पुन्हा गट विकास अधिका-यांना पत्र देऊन पुराव्यांसह अहवाल मागितला होता. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही पुराव्यासह अहवाल दिला नाही. याबाबत विचारणा केली असता, ग्रामपंचायतीकडून अहवाल आला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाचोरा गटविकास अधिकारी अहवाल देण्यास दिरंगाई करून सरपंचांना पाठीशी घालत असल्याचा आरोप उपोषणकर्त्या सदस्यांनी केला आहे. जोपर्यंत पुराव्यासह अहवाल मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. याप्रसंगी दशरथ पाटील, पी.के. पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नवल गुजर, ईश्वर धनगर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव