शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

निधीच्या खर्चावरून जळगाव जि.प.ची सभा गाजण्याचे चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:38 IST

२३ रोजी सर्व साधारम सभा

ठळक मुद्देअर्थसंकल्पही होणार सादरव्यापारी गाळेही ठरणार कळीचा मुद्दा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १७ - २१ कोटींचे नियोजन असलेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी २३ मार्च रोजी जि.प.ची सर्वसाधरण सभा दुपारी एक वाजता अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या उपस्थित होणार आहे. गेल्या वर्षाचा डीपीडीसी व इतर निधी मार्च महिना आला तरी खर्च न झाल्याने विरोधकांकडून अर्थसंकल्पीय सभा गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गेल्या वर्षी नियोजन करण्यात आलेला महिला बालकल्याण व समाज कल्याण विभागाचा निधी खर्च झाला नाही. त्यातच रस्त्यांच्या कामांचे आता कायार्देश दिले जात आहे. हा निधी मार्च अखेर खर्च होणे शक्य नसल्याने याच मुद्यावर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात यावर्षी १ कोटीची घट झाली आहे. उत्पन्नाचे स्त्रोत शोधण्यास व उत्पन्न वाढविण्यात सत्ताधाºयांना अपयश आल्याने या वर्षी २०१७-१८ चा सुधारीत व २०१८-१९ चा मूळ अर्थसंकल्प मंजूर करताना कसरत करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी अर्थ समितीने अर्थसंकल्प मंजुरीची शिफारस सर्वसाधारण सभेत केली आहे.व्यापारी गाळेही ठरणार कळीचा मुद्दाजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गेल्या तीन महिन्यांपूर्वीच अल्पबचत भवनातील करार संपलेल्या २० गाळ््यांचा विषय घेण्यात आला होता. १४ वर्ष होवूनही गाळे लिलाव करण्यात आले नसल्याने त्या गाळ्यांची संबंधितांकडून थकबाकी व्याजासह वसूल करून नव्याने लिलाव करण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र तीन महिन्यात प्रशासनाकडून काहीच कार्यवाही करण्यात आले नाही. परिणामी जि.प.ला उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे हा विषय गाजण्याची शक्यता आहे.जळगाव, एरंडोल, रावेर तालुक्यातील २३ शाळा जीर्ण झाल्याने त्यांच्या निर्लेखनाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. तसेच ग्रामविकास निधीतून कर्ज मंजुरीचा ठरावदेखील विषय सूचीत ठेवण्यात आला आहे. एकूण १० विषयांवर सर्वसाधारण सभेत चर्चा करून मंजुरी घेतली जाणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावzpजिल्हा परिषद