शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात जळगावचा तरूण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:46 IST

पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावानजीक महामार्गवर १४ जूनच्या रात्री १२़३० वाजता झालेल्या कारच्या अपघातात शहरातील इंद्रप्रस्थ नगरात वास्तव्यास असलेल्या अनिल प्रभाकर सोनवणे (वय २७) याचा जागीच मृत्यू झाला़

ठळक मुद्देमोंढाळे गावानजीक झाला अपघातधुळे येथील खाजगी रुग्णालयात दोघा जखमींवर उपचारसुरत येथे माल घेण्यासाठी जात असताना अपघात

जळगाव- पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावानजीक महामार्गवर १४ जूनच्या रात्री १२़३० वाजता झालेल्या कारच्या अपघातात शहरातील इंद्रप्रस्थ नगरात वास्तव्यास असलेल्या अनिल प्रभाकर सोनवणे (वय २७) याचा जागीच मृत्यू झाला़ दरम्यान, या अपघातात कल्पेश मनोहर कापडणे (वय २० रा. ईश्वर कॉलनी), शुभम लोहार (वय २६ रा. सिंधी कॉलनी) हे दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.शहर पोलिस स्टेशनच्या मागील बाजुस असलेल्या मार्केटमधील एका दुकानात इंद्रप्रस्थ नगरातील अनिल सोनवणे, कल्पेश कापडणे, शुभम लोहार हे तिघे मालकाच्या मुलाला व दुकानातील माल घेण्यासाठी सुरत येथे जाण्यासाठी एमएच़१९़ ०६०९ या क्रमांकाच्या कारने रात्री १०.३० वाजता जळगावातून निघाले. पारोळा तालुक्यातील मोंढाळा गावापासून काही अंतरावर असलेल्या एच.पी.पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने रात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात कारचालक अनिल सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जखमी शुभम लोहार व कल्पेश कापडणे या दोघांना तात्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने धुळे येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात