जळगावच्या तरुणाचा हरीपुरा धरणात मृतदेह आढळला
By Admin | Updated: June 28, 2017 12:53 IST2017-06-28T12:53:20+5:302017-06-28T12:53:20+5:30
जळगाव येथील कासमवाडीतील रहिवासी तरुण वसीयोद्दीन कुरेशी (वय 21) याचा मृतदेह बाहेर काढण्यात यावल पोलिसांना यश आले.

जळगावच्या तरुणाचा हरीपुरा धरणात मृतदेह आढळला
ऑनलाईन लोकमत
यावल,दि.28-जळगाव येथील कासमवाडीतील रहिवासी तरुण वसीयोद्दीन कुरेशी (वय 21) याचा मृतदेह बाहेर काढण्यात यावल पोलिसांना यश आले. जळगावचा हा तरुण काही मित्रांसह रमजान ईद निमित्त यावल तालुक्यातील हरीपुरा येथील हसनबाबा दग्र्यावर दर्शनासाठी आले होते. काही तरुण दर्शन घेण्यासाठी थांबले तर काही तरुण हरीपुरा धरणावर पोहण्यासाठी गेले.त्यात वसीयोद्दीन याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्रभर त्याचा शोध घेतला.आज सकाळी मृतदेह आढळला.