शहरं
Join us  
Trending Stories
1
महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
3
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
4
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
5
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
6
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
7
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
8
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
9
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
10
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
11
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
12
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
13
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
14
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
15
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
16
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
17
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
18
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
19
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
20
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात महिलांनी रोखला मंत्र्यांचा ताफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:25 IST

वारंवार खंडीत वीज पुरवठ्यामुळे उतरले नागरिक रस्त्यावर

जळगाव : गेल्या वर्षभरापासून शहरातील वाल्मिक नगरात खंडीत वीज पुरवठा होत असून त्याची दखलच घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी या भागातून जाणारे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफाच रोखून त्यांना घेराव घातल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.ऐन गणेशोत्सवात विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी वाल्मिक नगर परिसरातील नागरिकांनी येथील विद्युत ट्रान्सफार्मरची आरती करुन महावितरणचा निषेध केला होता. आता शनिवारी सहकार राज्यमंत्री पाटील हे आसोदा येथे एका कार्यक्रमासाठी याच भागातून जात असल्याचे समजल्याने १०० ते १५० महिलांनी रस्त्यावर बसून त्यांचा ताफा अडविला. विज पुरवठा सुरु केल्याशिवाय मंत्र्यांना या ठिकाणाहून पुढे जाऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला. महावितरणविरोधात घोषणाबाजी केली. मंत्री वाहनातून उतरताच महिलांनी त्यांना घेराव घातला. त्यावेळी एकच गोंधळ उडून तणाव निर्माण झाला होता.यानंतर मंत्र्यांनी उपस्थित महिलांना सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरु होईल, माझी वाट सोडा, अशी विनंती केल्यावर, महिलांनी त्यांच्या वाहनाच्या ताफ्याला वाट मोकळी करुन दिली. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत महावितरणचा एकही अधिकारी या भागात आलेला नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवरमहिलांनी वर्षभरापासून आमच्या भागात वीज नसल्यामुळे आम्ही कसे जगावे, असा प्रश्न उपस्थित करीत संताप व्यक्त केला. महिलांचा हा संताप पाहून मंत्र्यांनी स्थानिक अभियत्यांना दूरध्वनी वरुन चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे या नागरिकांनी माझीच वाटच अडविली आहे. मला एका कार्यक्रमाला तात्काळ जायचे आहे. आता मी कसा जाणार, तुम्ही यांचा वीज पुरवठा केव्हा सुरु करणार? असे विचारत त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना ताबडतोब घटनास्थळी बोलावले.

तुमच्या सोबत मीच उपोषणाला बसणारसायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरु होण्याचे आश्वासन दिल्यावरही काही महिला मात्र वीज पुरवठा सुरु होईपर्यंत वाट सोडण्यास तयार नव्हत्या. यावेळी मंत्र्यांनी सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरु झाला नाही, तर मला परत फोन करा, मीच तुमच्या सोबत या ठिकाणी उपोषणाला बसणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मंत्र्यांच्या आश्वासनावर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :Jalgaonजळगाव