जळगावात रस्त्यात पडलेल्या वीज तारांनी घेतला महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:21+5:302021-07-21T04:13:21+5:30

जळगाव : तांबापुरातील बिलाल चौकात रस्त्यात पडलेल्या वीज तारांनी मंगळवारी दुपारी जिनातबी हुसेन शेख (वय ५०) या महिलेचा बळी ...

In Jalgaon, a woman was killed by a power line falling on the road | जळगावात रस्त्यात पडलेल्या वीज तारांनी घेतला महिलेचा बळी

जळगावात रस्त्यात पडलेल्या वीज तारांनी घेतला महिलेचा बळी

जळगाव : तांबापुरातील बिलाल चौकात रस्त्यात पडलेल्या वीज तारांनी मंगळवारी दुपारी जिनातबी हुसेन शेख (वय ५०) या महिलेचा बळी घेतला. महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराविषयी रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

जिनातबी हुसेन शेख या मंगळवारी दुपारी ४ वाजता घराच्या बाहेर निघाल्या असता रस्त्यात वीज तार पडलेली होती, त्यात वीज प्रवाह सुरुच होता. त्याला जिनातबी यांचा स्पर्श झाल्याने त्या लांब फेकल्या गेल्या. हा प्रकार लक्षात येताच गल्लीतील नागरिकांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासणी केल्यानंतर महिलेस मृत घोषित केले. जिनातबी यांच्या पश्चात मुलगा सय्यद शकील, सून, नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: In Jalgaon, a woman was killed by a power line falling on the road