शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: महायुतीचे सरकार येण्यासाठी आम्हीही प्रचंड त्रास सहन केला, गुलाबराव पाटील यांचं मोठं विधान

By अमित महाबळ | Updated: January 14, 2024 20:01 IST

Gulabrao Patil: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रचंड त्रास सहन केला. त्या परिस्थितीत काय होईल हे माहीत नव्हते. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते? याचा विचार भाजपा कार्यकर्त्यांनी करावा, अशी भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली.

- अमित महाबळजळगाव  - राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रचंड त्रास सहन केला. त्या परिस्थितीत काय होईल हे माहीत नव्हते. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते? याचा विचार भाजपा कार्यकर्त्यांनी करावा, अशी भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली.

जळगाव जिल्हा शिवसेना व भाजपाचा बालेकिल्ला आहे. आमची युती बळजबरीने झालेली नाही, तर हिंदुत्वाच्या विचारांवर आधारित आहे. महायुतीचे सरकार येण्यासाठी आम्हाला सर्वांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्या दिवसांत मुले, आई, बायकोला गद्दार म्हणून हिणवले गेले. आमचे घरातले फोन बंद असायचे. त्या परिस्थितीत काय होईल हे आम्हाला माहीत नव्हते. भाजपा कार्यकर्त्यांनी आमचा विचार करून पाहावा. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते ? असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

आम्हीही झेंडे वाटले...प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत. आम्हीही गावात झेंडे वाटले. आंदोलनादरम्यान कारागृहात गेलो होतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतही १०० टक्के युती झाली पाहिजे. ६०-६५ दिवसांवर लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत. त्या आजपासूनच लागल्या आहेत, असे समजावे. महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गडबड करत असेल तर त्याला समज देण्याची जबाबदारी समन्वयकांची आहे, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलJalgaonजळगाव