- शाम सराफ पाचोरा (जि. जळगाव) - शेतातील तळ्यात बुडून तरुणासह दोन जणांचा मृत्यू झाला. ही घटना अंतुर्ली ता. पाचोरा येथे गुरुवारी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र प्रभात कोळी (१४, रा. पुनगाव ता. पाचोरा) आणि पदमसिंग भगवान पाटील (२१, रा. अंतुर्ली बुद्रूक ता. पाचोरा) अशी बुडालेल्या दोन जणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही शेतमजुरीचे काम करीत होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. याबाबत पाचोरा पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु होते.
Jalgaon: शेततळ्यात बुडून तरुणाासह दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 20:19 IST