शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: तोतया तृतीयपंथीला निर्वस्त्र करून चोपले! सागर पार्क परिसरातील प्रकार

By सागर दुबे | Updated: April 29, 2023 13:09 IST

Jalgaon: साडी-चोळी नेसून साजश्रृंगार करत ख-या तृतीयपंथीयांसारखे हातवारे करून नागरिकांच्या घरात शिरून जबरीने पैशांची मागणी करणा-या तोतया तृतीयपंथीला ख-या तृतीयपंथींनी निर्वस्त्र करून धुलाई केल्याची घटना शनिवारी सकाळी आडेआठ वाजेच्या सुमारास सागरपार्क परिसरामध्ये घडली.

- सागर दुबे

जळगाव -  साडी-चोळी नेसून साजश्रृंगार करत ख-या तृतीयपंथीयांसारखे हातवारे करून नागरिकांच्या घरात शिरून जबरीने पैशांची मागणी करणा-या तोतया तृतीयपंथीला ख-या तृतीयपंथींनी निर्वस्त्र करून धुलाई केल्याची घटना शनिवारी सकाळी आडेआठ वाजेच्या सुमारास सागरपार्क परिसरामध्ये घडली. यावेळी नागरिकांचा प्रचंड समुदाय या परिसरामध्ये गोळा झाला होता. धुलाई केल्यानंतर तोतयाला सोडून देण्यात आले.

सागरपार्क परिसरामध्ये तीन तोतया तृतीयपंथीयांच्या वेशभूषेत नागरिकांच्या घरात शिरून पैशांची मागणी करीत होते. त्यांचा त्रास जाणवल्यानंतर तेथील नागरिकांनी ख-या तृतीयपंथींना त्याची माहिती दिली. काही वेळात ख-या तृतीयपंथीयांनी सागर पार्क परिसर गाठले. त्यांनी तिघा तोतयांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण, दोन जण पसार झाले तर एक त्यांच्या हाती लागला. त्यांनी त्याला नागरिकांना का त्रास देता आहेत असे म्हणत निर्वस्त्र करून चांगलीच धुलाई केली. या प्रकारामुळे बघ्यांची प्रचंड गर्दी रस्त्यावर झाली होती. त्या तोतयाला तृतीयपंथींनी चोप दिल्यानंतर सोडून दिले. तोतयांचा वाढता होता त्रास...गेल्या सात ते आठ दिवसांपूर्वी या तोतया तृतीयपंथींनी कुसूंबा येथील एका महिलेच्या थेट घरामध्ये शिरून पैशांची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी जबरीने सतराशे काढून घेतले होते. तर समता नगरामध्ये देखील वृध्द महिलेला पैशांसाठी त्रास दिला होता. तसेच शिवकॉलनीमध्ये सुध्दा थेट घरामध्ये शिरून पैसे मागितले होते. हा प्रकार ख-या तृतीयपंथीयांना माहिती झाल्यानंतर त्यांनी त्यांना समज दिली होती. मात्र, त्यानंतरही त्यांनी तोच प्रकार केल्यामुळे अखेर शनिवारी तोतयाची धुलाई करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव