जळगाव तालुक्यात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला पेट्रोल टाकून जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 16:27 IST2018-01-23T16:24:54+5:302018-01-23T16:27:21+5:30
चारित्र्यावर संशय घेऊन अशरफ मोईद्दीन तडवी याने पत्नी छोटीबाई हिच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता तालुक्यातील उजाड कुसुंबा येथे घडली. या घटनेत छोटीबाई ७५ टक्के जळाली असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पती अशरफ याला पोलिसांनी अटक केली आहे.

जळगाव तालुक्यात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला पेट्रोल टाकून जाळले
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२३ : चारित्र्यावर संशय घेऊन अशरफ मोईद्दीन तडवी याने पत्नी छोटीबाई हिच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता तालुक्यातील उजाड कुसुंबा येथे घडली. या घटनेत छोटीबाई ७५ टक्के जळाली असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पती अशरफ याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अशरफ मोईद्दीन तडवी हा उजाड कुसुंबा येथे पत्नी छोटीबाई व मुलगी करीना यांच्यासह वास्तव्याला आहे. अशरफ याचे किराणा दुकान आहे तर पत्नी मिळेल ते मजुरीचे काम करते. मंगळवारी सकाळी छोटीबाई चुलीवर स्वयंपाक करीत असताना अशरफ हा तिच्याजवळ गेला ‘तु चांगली नाही, तुझे कोणाशी तरी संबंध आहेत’ असे म्हणत मी तुला जीवंत ठेवणार नाही, तुला मारुन मी देखील जेलमध्ये जावून बसेल असे धमकावत होता. त्यावेळी तो लगेच घराबाहेर गेला व किराणा दुकान ठेवलेली पेट्रोलची बाटली घेऊन आला. नंतर छोटीबाई हिच्या अंगावर पेट्रोल ओतले व पेटती आगकाडी अंगावर फेकली. मुलीने केला वाचविण्याचा प्रयत्न हा थरार पाहिल्यानंतर मुलगी करीना घाबरली. तिने तातडीने घरातील पाणी आईच्या अंगावर ओतले. मुलगी व छोटीबाई यांची आरडाओरड होत असल्याने घराशेजारी राहणारे छोटीबाई हिचा भाऊ अकिल शेनफडू तडवी, आई मंडाबाई यांनी धाव घेत तातडीने छोटीबाई हिला जिल्हा रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक समाधान पाटील व भरत लिंगायत यांनी रुग्णालयात येऊन छोटीबाई हिचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर पती अशरफ याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुध्द कलम ३०७ जीवंत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, समाधान पाटील व भरत लिंगायत यांनी दुपारी उजाड कुसुंबा येथे जाऊन घटनास्थळा पंचनामा केला.