जळगाव-तळई बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:58+5:302021-06-26T04:12:58+5:30
सैनिक रुग्णालयाचेही सुशोभिकरण जळगाव - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या भिंतीचे सुशोभिकरण करणारे प्राचार्य डॉ. अविनाश काटे व त्यांच्या पत्नी ...

जळगाव-तळई बससेवा सुरू
सैनिक रुग्णालयाचेही सुशोभिकरण
जळगाव - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या भिंतीचे सुशोभिकरण करणारे प्राचार्य डॉ. अविनाश काटे व त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या कलाकृतीची दखल दिल्लीतही घेण्यात आली. त्यामुळे काटे दाम्पत्य आता दिल्लीतील सैनिकांच्या रुग्णालयाच्या भिंती व आतील काही भागाची रंगरंगोटी करणार आहेत. जीएमसी जळगावच्या या सुशोभिकरणाची दिल्लीतील फेस इंडिया फाऊंडेशन फॉर आर्ट, कल्चर अँड एज्युकेशन ट्रस्टने दखल घेतली होती.
१५ जणांना श्वान दंश
जळगाव : शहरातील १५ जणांना शुक्रवारी विविध भागामध्ये कुत्र्याने चावा घेतल्याने हे १५ रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आले होते. पहिला इंजेक्शनचा डोस देऊन त्यांना दुसऱ्या डोसची तारीख देण्यात आली आहे. दरम्यान, मोकाट कुत्र्यांचा चावा घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.